घररायगडनववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी फार्महाऊसला पसंती; सुधागडसह विविध तालुक्यांत पर्यटकांचा ओघ

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी फार्महाऊसला पसंती; सुधागडसह विविध तालुक्यांत पर्यटकांचा ओघ

Subscribe

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र कमालिचा उत्साह असतानाच ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशनसाठी अनेकांनी ग्रामीण भागातील निसर्गरम्य फार्म हाऊसला पसंती दिल्याचे दिसून येत असून त्यामुळे बहुतांश फार्म हाऊस सध्या फुल्ल झाले आहेत. सुधागडसह विविध तालुक्यांत पर्यटकांचा ओघ वाहत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थाही तेजीत आली आहे.

पाली: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र कमालिचा उत्साह असतानाच ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशनसाठी अनेकांनी ग्रामीण भागातील निसर्गरम्य फार्म हाऊसला पसंती दिल्याचे दिसून येत असून त्यामुळे बहुतांश फार्म हाऊस सध्या फुल्ल झाले आहेत. सुधागडसह विविध तालुक्यांत पर्यटकांचा ओघ वाहत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थाही तेजीत आली आहे.
गद्रेज नंदनवन अ‍ॅग्रो टुरिझमचे संचालक जितेंद्र गद्रे म्हणाले की, शहरातील मंडळींना ग्रामीण भागात असलेले फार्महाऊस व अ‍ॅग्रो टुरिझमचे आकर्षण आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी त्यांची येथे पसंती असते.निसर्गरम्य वातावरण, शुद्ध हवेचा आणि सात्विक आहाराचा ते आनंद घेतात. शिवाय काही काळ मोबाईल नेटवर्कपासून दूर गेल्याने रिफ्रेश होतात. शहरातील गर्दी कोलाहल आणि प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त मजा लुटण्यासाठी फार्म हाऊसपेक्षा दुसरी चांगली जागा नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय फार्महाऊसमध्ये कुटुंबासमवेत सेलिब्रेशन करणे अनेकांना सुरक्षित वाटे. कारण कुठल्यातरी नवख्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये सुरक्षिततेची आम्ही नसते. त्यामानाने फार्म हाऊस मध्ये सुरक्षितता लाभते अनुचित प्रकार घडण्याची शक्यता कमी असते तेथे राहणे प्रवास करणे सोयीचे ठरते.

पोपटी आणि चुलीवरील जेवणाला पसंती
फार्महाऊसवर प्रामुख्याने चुलीवर शिजवलेल्या जेवणाला अधिक पसंती आहे. त्यामध्ये चुलीवरचे मटण किंवा चिकनला अधिक पसंती. काही ठिकाणी बार्बेक्यू ची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जिल्ह्यातील प्रसिद्ध पोपटीचा बेत हमखास केला जातो.

- Advertisement -

कॅम्पेन आणि निसर्ग सफर
ज्यांना रूममध्ये राहायचे नसेल त्यांच्यासाठी खास तंबू टाकून कॅम्पेनची व्यवस्था केली जाते. याबरोबरच आजूबाजूचे निसर्ग, डोंगर, किल्ले या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव देखील दिला जातो. बहुतांश ठिकाणी स्विमिंगपुल असलेले फार्महाऊस आहेत. स्विमिंगपुलमध्ये डुंबण्याचा आनंद लोक घेतात. बैलगाडीची सफर सुद्धा करतात. फार्महाऊसवर मोजमजा करताना थकवा आल्यास पाहिजे तेव्हा आराम करणे शक्य होते. आराम केल्यावर पुन्हा मोजमजा करता येते. फार्म हाऊस विविध उपक्रम खेळ घेता येतात लहान मुले वृद्ध यांच्यासाठी तर फार्म हाऊस खूपच लाभदायक ठरते.

जिल्ह्यात हजारोंच्या घरात फार्महाऊस आहेत. काही वैयक्तिक वापरतात तर बहुतांश फार्महाऊस मालक भाड्याने देतात आणि ऍग्री व इकोटूरिझमचा व्यवसाय सुद्धा करतात. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येथील बुकिंग फुल्ल झाली आहे. या १० दिवसांत जिल्ह्यातील सर्वांचे भाडे, खाणेपिणे, अक्टिव्हिटी असे एकत्रित मिळून साधारण १० ते १५ कोटींहून अधिकची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
– अमित निंबाळकर,
फार्म हाऊस विकसक

- Advertisement -

बहुतांश लोकांनी मित्रपरिवार व कुटुंबासमवेत निसर्गरम्य वातावरणात सेलिब्रेशन करण्यासाठी फार्म हाऊस बुक केले आहे. आलेल्या पाहुण्यांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा वाजवी दरात पुरवितो. ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व दुकानदारांना (चिकन, मटण, डेकोरेटर्स आदी) देखील यामुळे चांगला फायदा होतो. स्थानिकांना रोजगार मिळतो. ग्रामीण आर्थिक घडी सुरळीत होते.
– संतोष बावधाने,
मालक, माऊंटन व्ह्यू फार्म अँड कॅम्पेन, गौळमाळ

यावर्षी ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी अनेक जण फार्महाऊस ला पसंती देतात. आगाऊ फार्म हाऊस बुकिंग झाली आहे. फॅमिली व ग्रुपसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचा आनंद देखील सुरक्षितपणे लोक आनंद घेतात.
– सुजित बारसकर,
संचालक, ठाकूर फार्म, नाडसुर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -