घररायगडप्रभाविष्कारमध्ये कलांचा छान अविष्कार; ‘जिवाची होतीया काहिली’मधील कलाकारांची उपस्थिती

प्रभाविष्कारमध्ये कलांचा छान अविष्कार; ‘जिवाची होतीया काहिली’मधील कलाकारांची उपस्थिती

Subscribe

गणेश वंदना, लग्नगीत, आई एकविरेची महती सांगणारे गाणे अशा लोकनृत्याच्या आविष्कारातून करण्यात आलेला संस्कृतीचा जागर आणि महागरब्याने प्रभाविष्कार कार्यक्रमाला खर्‍या अर्थाने रंगत आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या चेहर्‍यावरील उत्साह, आनंद ओसंडून वाहत असल्याचे यावेळी दिसून आले. ‘जिवाची होतीया काहिली’फेम अभिनेते राज हंचनाळे, अभिनेत्री प्रतीक्षा शिवकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या कलाकारांनी मुलांसोबत विविध नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंग भरले.

अलिबाग: गणेश वंदना, लग्नगीत, आई एकविरेची महती सांगणारे गाणे अशा लोकनृत्याच्या आविष्कारातून करण्यात आलेला संस्कृतीचा जागर आणि महागरब्याने प्रभाविष्कार कार्यक्रमाला खर्‍या अर्थाने रंगत आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या चेहर्‍यावरील उत्साह, आनंद ओसंडून वाहत असल्याचे यावेळी दिसून आले. ‘जिवाची होतीया काहिली’फेम अभिनेते राज हंचनाळे, अभिनेत्री प्रतीक्षा शिवकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या कलाकारांनी मुलांसोबत विविध नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंग भरले.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी येथील संकुलाद्वारे आयोजित प्रभाविष्काराची सांगता झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, माजी नगरसेवक अनिल चोपडा, नगरसेविका अश्विनी पाटील, वृषाली ठोसर, संजना कीर, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. वाझे, प्रा. विक्रांत वार्डे, प्र. प्राचार्य ओमकार पोटे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. पल्लवी पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी माजी नगराध्यक्ष नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी मनोगतातून पीएनपीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. तसेच प्रभाविष्कारात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे त्यांनी भरभरुन कौतुक केले.

राज, प्रतीक्षाचा कोळी गीतावर ठेका
‘जिवाची होतीया काहिली’ फेम राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवकर यांनी कोळीगीतावर मनसोक्त केलेले नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. कलाकारांसोबत बेधुंदपणे कला सादर करणार्‍या या कलाकारांना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली.

- Advertisement -

.
पंचरत्नांचा सन्मान
पीएनपीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कला विभागात विराज म्हात्रे तसेच सातवीतील सान्वी निर्गुळे, सामाजिक विभाग अरमान सय्यद, मानसी नागरे, शैक्षणिक विभाग संयुक्ता हजरे, प्रथा रत्नाकर पाटील, क्रीडा विभाग संदीप पाल, आसावरी गावंड, साहित्य विभाग महेश नायकुडे, निशिका पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -