घररायगडवंजारपाडा-देवपाडा रस्त्यासाठी शासनाकडे निधीच नाही, ग्रामस्थांची सोशल मिडियावर नाराजी

वंजारपाडा-देवपाडा रस्त्यासाठी शासनाकडे निधीच नाही, ग्रामस्थांची सोशल मिडियावर नाराजी

Subscribe

महाविकास आघाडी, पंचायत समिती, जिल्हापरिषद, आमदार, खासदार वंजारपाडा-देवपाडा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करू शकत नाही ही एक लाजिरवाणी बाब आहे, अशी नाराजी आता सोशल मिडीवर ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यातून कोटयावधी रूपये खर्च करून विकासकामे सुरू आहेत. त्यात अनेक भागात रस्तेदेखील बनविले जात आहेत. परंतू गेल्या १० वर्षांपासून नादुरूस्त, खड्डेमय आणि धोकादायक स्थितीत असलेल्या वंजारपाडा-देवपाडा रस्त्याला कोणत्याच विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने देवपाडा ग्रामस्थांनी सोशल मिडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

नेरळ-कळंब राज्यमार्गाला लागून आणि पुढे कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला जोडणारा दहिवली-देवपाडा या रस्त्यावरील वंजारपाडा ते देवपाडा पुढे चिंचवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे, धूळ अशा अनेक समस्यांचा सामना या रस्त्यावरून येता -जाताना करावा लागत आहे. देवपाडा गावासह परिसरात चार ते पाच आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. परंतु या स्त्यावरून दुचाकी चालवणे देखील धोकादायक बनले आहे. अनेक ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे तक्रारी, निवदेन देऊनही रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. अत्यंत धोकादायक रस्त्यामुळे या रस्त्यावरील एसटी सेवा देखील बंद करण्यात आली आहे. रिक्षा, दुचाकी देखील जीव मुठीत घेवून चालवावी लागत आहे.

- Advertisement -

या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींसह, बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, पंचायत समिती, जिल्हापरिषद, आमदार, खासदार वंजारपाडा-देवपाडा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करू शकत नाही ही एक लाजिरवाणी बाब आहे, अशी नाराजी आता सोशल मिडीवर ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने तात्काळ या रस्त्याची पाहणी करून निधी उपलब्ध करून द्यावा आणि आमचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी देवपाडा गावासह परिसरातील आदिवासी वाडयांमधील आदिवासी बांधवाकडून केली जात आहे.

गेल्या १० वर्षापासून वंजारपाडा-देवपाडा-चिंचवाडी रस्ता खड्डेमय झाला आहे. निवडणूकीत आश्वासने देणार्‍या लोकप्रतिधींना या परिसरातील नागरिकांचे हाल दिसत नाहीत का? त्यामुळे तात्काळ या रस्त्याची पाहणी करून निधी उपलब्ध करावा, अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे.
– ज्ञानेश्वर राणे, ग्रामस्थ, देवपाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -