घररायगडरोह्यात अनधिकृत फार्म हाऊसचे पेव, कारवाई करण्यासाठी मनसेचे निवेदन

रोह्यात अनधिकृत फार्म हाऊसचे पेव, कारवाई करण्यासाठी मनसेचे निवेदन

Subscribe

रोहे तालुक्याला बारमाही वाहणारी कुंडलिका नदी व नैसर्गिक विविधतेने नटलेली वनसंपदा लाभली आहे. त्यामुळे खळखळणार्‍या नदीच्या किनार्‍यालगत वा उंच डोंगरात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आपले एक फार्म हाऊस असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

तालुक्यात दिवसेंदिवस फार्म हाऊस बांधून त्यांचा व्यावसायिक वापर होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही फार्म हाऊस व अन्य बांधकामे होत असताना कोणत्याही परवानग्या शासनाच्या संबंधित विभागांकडून घेण्यात येताना दिसत नाही. यामुळे शासनाच्या बांधकाम विषयक नियमांची पायमल्ली या धनदांडग्या शेतकर्‍यांकडून होत महसूलही बुडवण्यात येत आहे. तालुक्यातील अशा अनधिकृत फार्म हाऊसवर कारवाई करावी , असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अमोल पेणकर यांनी रोहा प्रांताधिकारी यांना दिले आहे. या निवेदनाची दखल प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी घेत तहसीलदार रोहा यांना सर्व मंडल अधिकार्‍यांना यासंबंधित पत्र काढत चौकशी करण्याच्या सूचना देणार असल्याचे सांगितले आहे.

रोहे तालुक्याला बारमाही वाहणारी कुंडलिका नदी व नैसर्गिक विविधतेने नटलेली वनसंपदा लाभली आहे. त्यामुळे खळखळणार्‍या नदीच्या किनार्‍यालगत वा उंच डोंगरात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आपले एक फार्म हाऊस असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. यामुळे स्थानिक शेतकर्‍यांकडून जमिनी खरेदी करत आज स्थानिकांसह मुंबई, पुण्यातील अनेक धनदांडग्यांनी तालुक्यात जमिनी विकत घेत फार्म हाऊस बांधली आहेत. मात्र, फार्म हाऊस व त्यालगत अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी करण्यात येणार्‍या बांधकामांसाठी बहुतांशी ठिकाणी कोणत्याही परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील अनेक फार्म हाऊसचा व्यावसायिक वापरदिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व जमिनी कृषक वापरासाठी वापरणे बंधनकारक असतानाही याचा जास्तीत जास्त वापर हा व्यावसायिक अकृषीक कामांसाठी होत आहे. स्थानिक पातळीवर यावर फक्त थातुरमातुर दंडात्मक कारवाई करण्यात येते. याामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणले.

- Advertisement -

यासंबंधी रोहा तहसील महसूल शाखेकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. त्यामध्ये तालुका महसूल विभागाने फार्म हाऊसवर दंडात्मक कारवाई करत असल्याची माहिती मनसे सचिव अमोल पेणकर यांना दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात रोहा महसूल प्रशासन स्वारस्य दाखवत नव्हते. तलाठी, मंडल अधिकारी हे सर्व वस्तुस्थिती जाणुनही केवळ आपले हात ओले करण्यातच धन्यता मानत असावेत. ही सर्व सत्यता प्रांताधिकारी यांचे निदर्शनास पुराव्यांसह निदर्शनास आणली. याची तातडीने प्रांताधिकारी यांनी दखल घेत तहसीलदार रोहा यांना यावर तातडीने पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -