घररायगडपोलादपुरात वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा 

पोलादपुरात वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा 

Subscribe

पोलादपूर तालूक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांच्या परिसरात वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांचे अंशतः नुकसान केले आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळीवार्‍या सह आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: ढवळी कामथी खोर्‍यातील डोंगररांगातील गांवांना झोडपले. यापैकी सह्याद्रीच्या डोंगरमाथा आणि पठारावर वसलेल्याहळदुले आणी दाभीळ या गावांमध्ये वादळी वार्‍याने पावसासह घातलेल्या धुमाकूळात हळदुळे गावातील आठ घरांचे नुकसान केले असून यात काही घरांवरिल पत्रे तर काहीघरांवरी कौले आणि कोने आकाशात भिरकावले गेले.

पोलादपूर: तालूक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांच्या परिसरात वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांचे अंशतः नुकसान केले आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळीवार्‍या सह आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: ढवळी कामथी खोर्‍यातील डोंगररांगातील गांवांना झोडपले. यापैकी सह्याद्रीच्या डोंगरमाथा आणि पठारावर वसलेल्याहळदुले आणी दाभीळ या गावांमध्ये वादळी वार्‍याने पावसासह घातलेल्या धुमाकूळात हळदुळे गावातील आठ घरांचे नुकसान केले असून यात काही घरांवरिल पत्रे तर काहीघरांवरी कौले आणि कोने आकाशात भिरकावले गेले.
दरम्यान, या घटनेची माहिती सरपंच बबिता दळ वी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी यांनी तातडीने तलाठी उत्तम गडगिले यांना कळविल्यानंतर गडगिले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरू केले आहे. दरम्यान सवाद, हावरे या गावांसह अन्य गावांच्या परिसरातही पाऊस झाला आहे.

२९ घरांह शासकीय इमारतींचे नुकसान
एका गुराच्या गोठ्याचेही नुकसान केले आहे. दाभीळ गावातील जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, सामाजिक सभागृह या शासकीय इमारतींचे तसेच गावातील विठ्ठल मंदिर मिळून २९ घरे आणि शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -