घररायगडफासात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू; मुरुडमधील भालगाव परिसरातील घटना

फासात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू; मुरुडमधील भालगाव परिसरातील घटना

Subscribe

येथील भालगाव परिसरातील जंगल भागात अंदाजे एक चार वर्षाचा आणि ४५ किलो वजनाचा बिबट्या रानटी डुकरांसाठी लावण्यात येणार्‍या फासात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळच्या दरम्यान एक बिबट्या फासात अडकल्याची माहिती प्रादेशिक वन विभागास मिळताच सर्व वरिष्ठ वनाधिकारी या ठिकाणी पोहचून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. या साठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही पाचारण करण्यात आले होते.परंतु सर्व यंत्रणा पोहचेपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता.फणसाड अभयारण्य परिसरात अनेक बिबटे असून यामधीलच एक बिबट्या भक्ष्य शोधण्याच्या नादात तो फासात अडकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुरुड: येथील भालगाव परिसरातील जंगल भागात अंदाजे एक चार वर्षाचा आणि ४५ किलो वजनाचा बिबट्या रानटी डुकरांसाठी लावण्यात येणार्‍या फासात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळच्या दरम्यान एक बिबट्या फासात अडकल्याची माहिती प्रादेशिक वन विभागास मिळताच सर्व वरिष्ठ वनाधिकारी या ठिकाणी पोहचून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. या साठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही पाचारण करण्यात आले होते.परंतु सर्व यंत्रणा पोहचेपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता.फणसाड अभयारण्य परिसरात अनेक बिबटे असून यामधीलच एक बिबट्या भक्ष्य शोधण्याच्या नादात तो फासात अडकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळच्या प्रहरी भालगाव गावापासून दोनशे मीटर अंतरावर असणार्‍या जंगल भागात हा बिबट्या फासात अडकला होता.दुचाकी गाड्यांना वापरण्यात येणारी वायर या फासासाठी वापरण्यात आली होती.फासात अडकल्यावर अधिक हालचाल केल्याने सदरचा फास अधिक आवळला गेला यामध्ये बिबट्याच्या कंबरेखालील भाग मोठ्या प्रमाणात अडकला गेला.परंतु वाचवणारी यंत्रणा पोहचून सुद्धा सदरील बिबट्याचा मृत्यू झाला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय सांगळे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून आपला अहवाल वनाधिकारी यांना दिला आहे.बिबट्याच्या मृत्युची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

… तर बिबट्याचा जीव वाचवता आला असता
बिबट्या फासात अडकल्याचे कळताच घटना स्थळी आलो. मात्र अशी घटना घडताच तातडीने आम्हाला फोन करणे आवश्यक होते.बिबट्या सारख्या देखण्या आणि आपल्या रायगडची शान असणार्‍या प्राण्याचा असा अंत होणे दुर्दैवाचे आहे. संकट प्रसंगी तत्काळ मदत न मिळाल्याने प्राण्यांचा मृत्यू होणे हे नक्कीच क्षम्य नाही. वनविभागाकडे याप्रकारच्या बाचावकार्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे यातून अधोरेखित होते. अशा वेळी वन्यप्राणी बचावकार्य करण्यात कार्यरत आणि निष्णात संस्था अथवा स्वयंसेवी मंडळींची मदत घेणे अतिशय महत्वाचे आहे, तसे केले असते तर सदर बिबट्याचा जीव नक्कीच वाचवता आला असता, अशी प्रतिक्रिया वन्यजीवप्रेमी संदीप घरत यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -