घररायगडकुंडलिकेसह गंगेच्या प्रदूषणाला एमआयडीसी जबाबदार?; पाणी विविध रंगाने रंगले

कुंडलिकेसह गंगेच्या प्रदूषणाला एमआयडीसी जबाबदार?; पाणी विविध रंगाने रंगले

Subscribe

पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा शहराची जीवनवाहीनी समजली जाणारी कुंडलिका आणि तिची उपनदी असलेल्या गंगेचे पाणी दररोज विविध रंगाने रंगू लागले आहे. यावर माजी सभापती हेमंत कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेत वास्तव प्रशासनासमोर मांडले. मात्र हे वास्तव स्वीकारून याची शहानिशा करण्याऐवजी नेहमीप्रमाणे यासाठी धाटावमधील कारखाने आणि आरआयए यांनाच दोषी ठरवण्याची परंपरा प्रशासनाने कायम ठेवली.

रोहे : पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा शहराची जीवनवाहीनी समजली जाणारी कुंडलिका आणि तिची उपनदी असलेल्या गंगेचे पाणी दररोज विविध रंगाने रंगू लागले आहे. यावर माजी सभापती हेमंत कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेत वास्तव प्रशासनासमोर मांडले. मात्र हे वास्तव स्वीकारून याची शहानिशा करण्याऐवजी नेहमीप्रमाणे यासाठी धाटावमधील कारखाने आणि आरआयए यांनाच दोषी ठरवण्याची परंपरा प्रशासनाने कायम ठेवली.
खरी वस्तुस्थिती काय, हे दाखवण्यासाठी आरआयए (रोहे इंडस्ट्रिअल असोसिएशन) चे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक दयानंद नांदगावकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उत्तम माने यांना प्रत्यक्ष बोलावत औद्योगिक वसाहतीची पाहणी केली. यावेळी सद्यःस्थितीत एमआयडीसी मार्फत चालविण्यात येणार्‍या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून कसे प्रदूषण करण्यात येते, याचे दर्शन घडले. मात्र वेळोवेळी असे प्रकार होऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र स्थानिक कारखान्यांवर प्रथम संशयाची सुई दाखवत कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र प्रदूषण करणार्‍या एमआयडीसी आणि सामाईक प्रक्रिया केंद्र चालवणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्याचे धाडस दाखविले जात नाही.
धाटावमधील प्रदुषणाबाबत कुंपणच शेत खातंय, अशी परिस्थिती प्रशासनाच्या या ‘मिलिजुली’ भूमिकेमुळे समोर येत आहे. एकूणच प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थानिकांना रोजगार देणारे कारखाने आणि कारखानदार, तसेच स्थानिकांच्या हितासाठी कार्यरत असलेली आरआयए यांनाच प्रत्येकवेळी प्रदुषणाबाबत दोषी ठरवणार की सामाईक प्रक्रीया केंद्र चालविणार्‍या एमआयडीसी आणि ठेकेदारावर कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सांडपाणी वाहून नेणार्‍या पाइपलाइनमधील चेंबर ओव्हरफ्लो 
धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सामाईक केंद्राद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते कुंडलिका खाडीत सोडण्यात येते. सुरुवातीस हे केंद्र आरआयएच्या नियंत्रणात चालविण्यात येत होते. गेल्या चार वर्षांपासून ते एमआयडीसी धाटाव उप विभागाच्या देखरेखीखाली खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात येते. एमआयडीसीचे योग्य नियंत्रण आणि नियोजन नसल्यामुळे सांडपाणी वाहून नेणार्‍या पाइपलाइनमधील चेंबर ओव्हरफ्लो होत आहे. केंद्रातील साठवणूक टाक्या, कारखान्यांमधून येणारे पाणी आणि प्रक्रिया केलेले पाणी पुढे खाडीकडे सोडणे यावर योग्य ते नियोजन नसल्यामुळे अशा घटना घडतात की कोणाच्या फायद्यासाठी घडविण्यात येतात, अशी चर्चा होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -