घरपालघरमालमत्ताधारकांसाठी यावर्षीही ‘अभय योजना’ लागू

मालमत्ताधारकांसाठी यावर्षीही ‘अभय योजना’ लागू

Subscribe

ही योजना लागू झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करात मोठी भर पडेल, शिवाय थकित मालमत्ताधारकांनाही दिलासा मिळेल, अशी आशा देशमुख यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रात यावर्षीही ‘अभय योजना’ लागू करण्यात आलेली आहे. थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास या योजनेंतर्गत दंडावर ५० टक्के बचत करता येणार आहे. ही योजना ६ फेब्रुवारीपासून मार्च २०२३ या कालावधीसाठी असल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे. महापालिका क्षेत्रातील ६०० फूट क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्ता धारकांकरता भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या धर्तीवर ‘अभय योजना’ लागू करावी, अशी मागणी वसई शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली होती. मागील वर्षी तत्कालिन आयुक्त डी. गंगाथरन यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पत्रान्वये ही मागणी करण्यात आलेली होती. ही योजना लागू झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करात मोठी भर पडेल, शिवाय थकित मालमत्ताधारकांनाही दिलासा मिळेल, अशी आशा देशमुख यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

ही योजना लागू केल्यानंतर वसई-विरारकरांनी त्यावेळी योजनेला भरघोस प्रतिसाद दिला होता. याचे परिणाम विक्रमी मालमत्ता कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले होते. मागील वर्षी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना या वर्षीही कायम करण्याचा निर्णय आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे. मागील वर्षी १४ मार्च २०२२ पर्यंत थकित कर असलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ घेता आला होता.
यावर्षी हा कालावधी ६ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३ असा आहे. महापालिकेने २०२२-२३ या वित्तीय वर्षात ५०० कोटी इतके उद्दिष्ट निर्धारित केले असून, ३० जानेवारी अखेर २७३.३४ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कराची वसुली आणखी प्रभावीपणे करण्याकरता विविध योजनांसह सात प्रभागांत कर अधीक्षक व कर विभाग प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -