घररायगडसरकार पाडण्यात इंटरेस्ट असलेल्यांनीच घरावर हल्ला केला, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा...

सरकार पाडण्यात इंटरेस्ट असलेल्यांनीच घरावर हल्ला केला, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप

Subscribe

जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा कोकणात सुरू आहे. या वेळी जयंत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त केले. विरोधकांनी आमचे सरकार पाडण्यासाठी पुर्वी आमदार फोडण्याचे प्रयत्न केले. त्यातून काही हाती लागले नाही म्हणून ईडी, आयटी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांना आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे लावले आणि आघाडीच्या नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न केला

शरद पवार साहेब यांच्या घरावर हल्ला कोणी केला, हे षडयंत्र कोणी रचले याचा तपास झाला पाहिजे. हे सरकार पाडण्यात ज्यांना स्वारस्य आहे त्यांनीच हा हल्ला केला असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. उरण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ते बोलत होते.

जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा कोकणात सुरू आहे. या वेळी जयंत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त केले. विरोधकांनी आमचे सरकार पाडण्यासाठी पुर्वी आमदार फोडण्याचे प्रयत्न केले. त्यातून काही हाती लागले नाही म्हणून ईडी, आयटी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांना आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे लावले आणि आघाडीच्या नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाचे लोक हे धुतल्या तांदळासारखे आहेत का असा सवाल व्यक्त करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर कोणताही पुरावा नसताना त्यांना अटक केली, असा घाणाघात त्यांनी भाजपावर केला. हे सगळे करूनही काहीही उपयोग होत नसल्यामुळे विरोधक आत्ता हतलब झाले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्याचे कारण केंद्र सरकार रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम असल्याचे सांगते. मात्र युद्ध सुरू होण्या अगोदर जी महागाई वाढली त्याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. उरण विधानसभा मतदार संघात शरद पवार साहेब यांना मानणारे अनेक कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे ताकद वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना सल्ला देताना एव्हरी डे इज चान्स असे सांगून कार्यकर्त्यांना पदे मिळण्यासाठी संयम आणि सबूरी ठेवण्याचा सल्ला दिला आणि आघाडीतील घटक पक्षांना प्रतिस्पर्धी न मानण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची देखील भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील आणि भावना घाणेकर यांनी उरणमधील समस्यांचा आढावा घेतला. या कार्यक्रमात जि.प. सदस्या कुंदा वैजनाथ ठाकूर, नागावचे माजी सरपंच परिक्षित ठाकूर आदी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, उमा मुंढे, अंकित साखरे, सक्षणा सलगर, सुनिल गव्हाणे, प्रशांत पाटील, भावना घाणेकर, वैजनाथ ठाकूर, मनोज भगत आदींसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील तटकरेंचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे म्हणाले की, उरण तालुक्याने राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. शरद पवार यांनी या भागातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के
योजनेचा लाभ मिळवून देण्यात मोठा हातभार लावला आहे. या भागातील हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा पुनर्वसनाबाबत येत्या महिना भरात मिटींग घेणार आहोत. तसेच येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अभिप्रेत असलेल्या जागा आघाडी कडून सोडल्या नाही तर आमचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत असा इशारा आघाडीच्या घटक पक्षांना त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -