घररायगडडम्पिंगच्या दुरवस्थेची नगराध्यक्षांकडून दखल

डम्पिंगच्या दुरवस्थेची नगराध्यक्षांकडून दखल

Subscribe

शहराच्या डम्पिंग ग्राऊंडच्या दुरवस्थेची आणि परिसरात होण्यार्‍या त्रासाची नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी दखल घेतली असून, त्यांनी तेथे भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली.

शहराच्या डम्पिंग ग्राऊंडच्या दुरवस्थेची आणि परिसरात होण्यार्‍या त्रासाची नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी दखल घेतली असून, त्यांनी तेथे भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. रोहे-अष्टमी नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड शहरानजीक पिंगळसई, धामणसई, माळसई या ग्रामपंचायतींच्या सीमेवर आहे. सद्यःस्थितीत ग्राऊंडची अंतर्गत आणि बाह्य भागात पूर्णतः दुरवस्था झाली आहे. शिवाय या ठिकाणी नगर परिषद वगळता लगतच्या ग्रामपंचायतींचा सर्व प्रकारचा कचरा गुपचूपपणे आणून बाहेर टाकण्याचे प्रमाणही वाढत आहे. याचा त्रास शेजारच्या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या पंचक्रोशीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या पडलेल्या संरक्षण भिंती, बाहेर टाकलेला सर्व प्रकारचा कचरा यामुळे स्थानिकांच्या शेत जमिनीचेही प्रदूषण होत असून, दुर्गंधीचा सामना स्थानिकांना सहन करावा लागत आहे.

खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे पिंगळसईचे माजी सरपंच अनंत देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राऊंडमुळे होणार्‍या त्रासाबाबत कैफियत मांडली. त्यानुसार तटकरे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष पोटफोडे यांनी तातडीने दखल घेत मंगळवारी ग्राऊंड परिसराची पाहणी केली. आगामी काळात स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करा, अशा सूचना त्यांनी आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर आणि स्वच्छता निरीक्षक निवास पाटील यांना दिल्या. यावेळी नगरसेवक महेश कोलाटकर, अनंत देशमुख, पिंगळसईचे उपसरपंच तानाजी देशमुख, संकेत देशमुख, नीलेश जंगम, हेमंत मालुसरे, मारुती तुपकर उपस्थित होते.

- Advertisement -

या डम्पिंग ग्राऊंडमध्ये शहरातील सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात येतो. याला लागूनच साळवी वाडा, गावठाण, धामणसई, सोनगाव,माळसई, मुठवली ही गावे आहेत. तेथील स्थानिकांच्या शेतजमिनी या संपूर्ण परिसरात आहेत. याशिवाय रेल्वे स्थानक आणि शहरात येण्यासाठी याच डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. संरक्षण भिंत पडली असल्यामुळे वार्‍याने प्लास्टिक आणि अन्य कचरा शेतात जात असल्याने पिकांवर परिणाम होत आहे.

हेही वाचा –

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करुन आरक्षण बहाल करावं, ‘SC’च्या निर्णयावर अशोक चव्हाणांची

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -