घररायगडशहरातील १५६ विसर्जनस्थळांवर महापालिकेकडून सुव्यवस्थित नियोजन

शहरातील १५६ विसर्जनस्थळांवर महापालिकेकडून सुव्यवस्थित नियोजन

Subscribe

Arrangements at 22 traditional natural and 134 artificial immersion sites

बेलापूर :
अत्यंत उत्साहात साजरा होत असलेल्या श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच,गौरीसह सहाव्या आणि सातव्या दिवसाचे श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने पार पडले असून आज,अनंत चतुर्दशीदिनीही सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातील प्राधान्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत आहे. यासाठीही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १५६ विसर्जन स्थळांवर महापालिकेकडून सुव्यवस्थितरित्या नियोजन करण्यात आले असून आवश्यकती खबरदारी घेण्यात येत आहे. यापूर्वी २२ पारंपारिक नैसर्गिक आणि १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व २२ विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था तसेच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस यंत्रणेचेही कायदा आणि सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. शिवाय सर्व २२ विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली असून याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करण्यासाठी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे.

भाविकांकडून प्रतिसाद
विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक अशा सुके निर्माल्य स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार्‍या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी उभारण्यात येणार्‍या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणार्‍या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. नागरिकांनी हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्तअभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -