घररायगडनागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

Subscribe

सध्या जिल्ह्यातील अलिबाग, पेण या २ तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या तालुक्यांतील ९९ गावे व वाड्यांना १२ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, टंचाईग्रस्त गावे व वाड्यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सध्या जिल्ह्यातील अलिबाग, पेण या २ तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या तालुक्यांतील ९९ गावे व वाड्यांना १२ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करावा. कपडे धुणे व भांडी घासण्यासाठी पिण्याचे पाणी न वापरता इतर स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करावा, सतत वाहने धुवू नयेत, विहिरींमधील गाळ काढण्यात यावा, अशा सूचना प्रशासनाने नागरिकांना केल्या आहेत.

- Advertisement -

तसेच दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत असल्याने पाणी संकलित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेरोसिमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करून सुमारे २ ते ३ रुपये प्रति लिटर इतक्या अल्प खर्चाने १० ते २५ हजार लिटरपर्यंत पाणी टाकी केवळ ८ ते १० दिवसांमध्ये निर्माण करणे शक्य असून, अशा टाक्या जास्तीत जास्त प्रमाणावर स्थापित कराव्यात. तसेच नागरिकांनी या वाड्या, वस्त्यांच्या आजूबाजूला असलेले पाण्याचे स्त्रोत शोधून जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावेत, जेणेकरून अशा नव्याने उपलब्ध पाण्याचा स्त्रोतापासून संबंधित वाडी, वस्तीवर पाणी पुरवठा योजना व जलशुध्दीकरण यंत्रणा स्थापित करून आवश्यक असलेला किमान पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होईल असेही डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -