घररायगडमाथेरानसह कर्जत तालुक्यात माथेरानसह कर्जत तालुक्यात

माथेरानसह कर्जत तालुक्यात माथेरानसह कर्जत तालुक्यात

Subscribe

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने शहरासह कर्जत तालुक्यात 50 ते 60 आदिवासी वाड्यांत 21 किलोचे चांगल्या दर्जाचे धान्य किट वाटप करण्याबरोबर घोड्यांना भुसा, जंगलातील माकड वानर, भटके कुत्रे, जनावरांचे खाद्य वाटप करुन रिलायन्स फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन काळात समाजाप्रती असलेली आस्था, तसेच सेवावृत्तीचे दर्शन घडवत रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी या परिवाराने संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. यामुळे खेड्यापाड्यातील, तसेच माथेरानसारख्या दुर्गम पर्यटनस्थळावरील नागरिक फाऊंडेशनचे ऋण व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांच्या होणार्‍या परवडीची कैफियत तरुण कार्यकर्ते तुकाराम बावदाणे यांनी अंबानी कुटुंबाकडे मांडली. यामुळे दुसया दिवशीच रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने अत्यावश्यक मदत देण्याचे आदेश अंबानी कुटुंबाने दिले. यानुसार बावदाणे आणि त्यांचे सहकारी उमेश सावंत यांनी अथक परिश्रम घेत दुर्गम भागात धान्याचे किट पोहचविण्याचे कौतुकास्पद काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -