घररायगडसुनेत्रा पवार, सुनील तटकरेंनी घेतली डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंनी घेतली डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

Subscribe

निलेश लंकेवर पक्षांतर बंदीची कारवाई करु-तटकरे

अलिबाग-: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार(अजित पवार गट) सुनेत्रा पवार त्याच बरोबरच रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार व राष्ट्रवादीचेप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र भूषण निरूपणकार डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवास स्थानी भेट घेतली. (Sunetra Pawar, Sunil Tatkare met Dr. Appasaheb Dharmadhikari)

यावेळी सचिनदादा धर्माधिकारी, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी प्रसिध्दी माध्यमांनी सुनील तटकरे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी नाशिक, बारामती, अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राजकीय घडोमोडीची माहिती दिली.

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदार संघातून विजय शिवतारे यांनी पुकारलेल्या बंडा बाबत तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर बैठक पार झाली असून शिवतारेंच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे.शिवतारे हे दोन ते तीन दिवसात प्रचारात उतरुन संपुर्ण ताकदीने सुनेत्रा पवार यांच्या मागे उभे राहतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

नाशिक लोकसभा मतदार संघात छगन भुजबळ यांना होणारा विरोध पाहता नाशिकच्या जागेबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, असे तटकरे म्हणाले. अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या मागे राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने उभी आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

- Advertisement -

निलेश लंकेवर पक्षांतर बंदीची कारवाई करु-तटकरे
निलेश लंके यांना लोकसभेची स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असून यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याने त्यांच्यावर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -