घरमहाराष्ट्रNashik Constituency : नाशिकची उमेदवारी 101 टक्के मलाच; हेमंत गोडसेंचा दावा

Nashik Constituency : नाशिकची उमेदवारी 101 टक्के मलाच; हेमंत गोडसेंचा दावा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी महायुतीत नाशिकच्या जागेवर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी केली आहे. अशातच आता शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोठा दावा केला आहे. मी प्रचाराला सुरुवात केली आहे. 101 टक्के मला उमेदवारी मिळणार, असा विश्वास हेमंत गोडसे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा सुटला नसल्याचे पाहायला मिळत आहे. (Nashik Constituency Nashiks candidature is 101 percent me Hemant Godses claim)

हेही वाचा – Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

आम्ही या अगोदरच मतदार संघामध्ये फेरी आमची पूर्ण झालेली आहे. आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, तुम्ही सकारात्मकपणे काम करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नाशिकच्या जागेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सर्व आमदार तुमच्या पाठीशी आहेत, पण तरीही निर्णय घ्यायला कुठेतरी वेळ लागतो आहे का? या प्रश्नावर बोलताना हेमंत गोडसे म्हणाले की, मला असं वाटतं की, महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत, त्या सर्वांसोबत चर्चा करून हे निर्णय घेतले जातात. त्यामुळे सर्वांसोबत चर्चा करून अधिकृत घोषणा केली जाईल.

शिवसेनेच्या पहिल्या यादीत तुमचं नाव नाही, याबाबत विचारले असता हेमंत गोडसे म्हणाले की, शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात असा शिवसेना खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. परंतु हा निर्णय महायुतीच्या पक्षातील नेते घेतली आणि दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये माझं नाव राहिलं. आम्हाला 100 टक्के विश्वास आहे की, आमच्यावर अन्याय होणार नाही. आमचे मुख्यमंत्री आम्हाला कुठे वाऱ्यावर सोडणार नाही, असे हेमंत गोडसे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

101 टक्के मलाच उमेदवारी मिळणार

जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, तर तुम्ही महायुतीचा प्रचार करणार का? या प्रश्नावर हेमंत गोडसे म्हणाले की, फक्त अधिकृत यादी जाहीर करायची आहे. आम्ही आधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा होईल. पण 101 टक्के मलाच उमेदवारी मिळणार आणि मोठ्या मताधिक्क्याने निवडूनही येणार, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.

नाशिकच्या जागेवरून तिढा कायम?

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी 24 मार्च रोजी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करत नाशिकची जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला तर यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकच्या जागेबाबत चर्चा केली. याशिवाय अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या जागेची मागणी केली होती. तसेच हेमंत गोडसे हे मागील दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. यानंतर आता त्यांनी नाशिकच्या जागेबाबत दावा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -