घरदेश-विदेशArvind Kejriwal : नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील याची काळजी घ्या; संयुक्त राष्ट्रांना...

Arvind Kejriwal : नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील याची काळजी घ्या; संयुक्त राष्ट्रांना देखील चिंता केजरीवालांची

Subscribe

नवी दिल्ली : कथित मद्य परवाना घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणी अरविंद केजरीवाल ईडी कोठडीत आहेत. केजरीवालांवर कारवाई तसेच त्यांची अटक केल्याप्रकरणी अमेरिका तसेच जर्मनी या देशांनी चिंता व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर संयुक्त राष्ट्राने या प्रकरणावरून कानपिचक्या देखील दिल्या आहेत. निवडणुकीदरम्यान देशातील लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित राहतील, अशी आमची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. त्यांनी केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

हेही वाचा – Thackeray group : भाजपाकडून जनतेची फसवणूक, प्रफुल्ल पटेलप्रकरणी ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

मतदान मुक्त वातावरणात होईल, अशी अपेक्षा

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, भारतासह कोणत्याही देशात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान स्थानिकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच प्रत्येक जण निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात मतदान करेल, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अमेरिकेने यापूर्वी देखील अरविंद केजरीवालांच्या अटकेबाबत चिंता व्यक्त केली होती. “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईवर भारतातील विरोधी पक्ष लक्ष ठेऊन आहेत. केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या प्रकरणाबाबत आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कायद्याच्या प्रक्रियेचे पालन होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Prakash Ambedkar : … तर पंतप्रधान मोदींना अटक केली पाहिजे; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

अमेरिकेबरोबरच जर्मनीनेही याबाबत चिंता व्यक्त केली होती. “अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईची दखल घेण्यात आली आहे. भारत हा लोकशाही असणारा देश आहे. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे”, असे जर्मनीने म्हटले होते.

अमेरिकेची प्रतिक्रिया अनुचित – परराष्ट्र मंत्रालय

अमेरिकेने गुरुवारी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याने भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. अमेरिकेची प्रतिक्रिया अनुचित असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या टिप्पणीवर भारताने बुधवारी अमेरिकी दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यानंतर पुन्हा अमेरिकेने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आमच्या देशांतर्गत निवडणूक आणि कायदेशीर प्रक्रियेला कोणत्याही बाहेरील यंत्रणेने दूषणे देणे हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -