घररायगडठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा आठ तास चौकशी 

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा आठ तास चौकशी 

Subscribe

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी हे अलिबाग तालुक्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. यावेळी आमदार साळवी यांची सुमारे आठ तास अधिकार्‍यांनी चौकशी केली. यापूर्वी आमदार साळवी यांची १४ डिसेंबर आणि २० जानेवारी रोजी तर त्यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांची ३ फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती.

अलिबाग: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी हे अलिबाग तालुक्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. यावेळी आमदार साळवी यांची सुमारे आठ तास अधिकार्‍यांनी चौकशी केली. यापूर्वी आमदार साळवी यांची १४ डिसेंबर आणि २० जानेवारी रोजी तर त्यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांची ३ फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती.
आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेच्या चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक असून चौकशीला घाबरत नाही असे स्पष्ट करीत आमदार साळवी हे या चौकशीला सामोरे गेले. तसेच त्यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले. त्यांच्यासह कुटुंबीयांकडे असलेल्या मालमत्तेची माहिती त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना दिली होती. तसेच आपल्याकडे संशय घेण्याइतपत बेकायदा मालमत्ता नसल्याचे सांगितले होते. २० जानेवारी रोजी तपासिक अधिकारी यांनी आमदार साळवी यांना मालमत्तेविषयक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आमदार राजन साळवी बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजार राहिले. यावेळी सुमारे आठ तास अधिकार्‍यांनी आमदार राजन साळवी यांची चौकशी केली.
दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने थेट जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी २००९ पासून केल्याला कामाचा तपशील मागवला होता. खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामांची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबाबतची माहिती मागवण्यात आली होती.
—————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -