घररायगडखालापूरमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी बेशिस्तपणे रस्त्यांचे खोदकाम

खालापूरमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी बेशिस्तपणे रस्त्यांचे खोदकाम

Subscribe

खोदाईचा खर्च वाचविण्यासाठी लांबलचक खोदाई करून काम केले जात असल्याने व ते काम विलंबाने होत असल्याने चांगल्या रस्त्यांची तोडफोड होत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. खड्डे करताना भूमिगत वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकारही घडत आहेत.

खालापूर तालुक्यात जागोजागी महानगर कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पेण – खालापूर मार्गांवर सावरोली गावाच्या हद्दीतील महामार्गावर रस्ते खोदून दगड, माती टाकून पाईपलाईन टाकली जात आहे. यावेळी सुरक्षा नियमांचे पालन न करता वाहनचालकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचे दिसून येत आहे.

पेण – खालापूर हा मार्ग ‘एक्सप्रेस वे’शी जोडला गेला असल्याने या मार्गावर वाहनांची दिवसरात्र वर्दळ सुरु असते. मात्र, बेशिस्तपणे खोदलेल्या कामाने एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही. रस्त्यांवर सुरू असलेल्या या कामांच्या सुरक्षततेबाबत तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुखांसह एमएसआरडीसी अधिकारी, महानगर गॅस कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ठेकेदाराकडून सर्रासपणे नियम पायदळी तुडवित काम केले जात आहे.
गॅस सिलिंडरऐवजी थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पोचविण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने तालुक्यातील रस्त्यांची खोदाई करून गॅस पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मुख्य रस्ते खोदाईसाठी व एमडीपी अर्थात प्लॅस्टिक पाइपलाइन टाकण्यासाठी अनेक ठेकेदारांना काम देण्यात आल्याचे समजते. रस्त्याच्या कडेला पाईपलाइन खोदताना ५० ते १०० मीटर खोदून तेथील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील खोदाई करावी, अशा अटी व शर्तीं नमूद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

खोदाईचा खर्च वाचविण्यासाठी लांबलचक खोदाई करून काम केले जात असल्याने व ते काम विलंबाने होत असल्याने चांगल्या रस्त्यांची तोडफोड होत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. खड्डे करताना भूमिगत वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच जलवाहिनीबाबतही अनेक तक्रारी होत आहेत. या संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अटी व शर्तींनुसार खोदलेले रस्ते दुरुस्त करून तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला खोदण्यात येत आहे. पाईप टाकल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. फक्त माती टाकून ढोबळमानाने काम केले जात आहे. वाहने गेल्यावर अनेक ठिकाणी माती दबून खड्डे दिसून येत आहेत. रस्ते वर-खाली असल्याने वाहने घसरून लहान-मोठे अपघात होत आहेत. पाईपलाईन टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे का? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत. कामाची जबाबदारी तहसील प्रशासनाची नसली तरी तालुक्यातील नागरिकांच्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी तर तहसील प्रशासनाची आहे ना? तसे असेल तालुक्यात सुरू असलेल्या कामांच्या सुरक्षततेबाबत तहसीलदार लक्ष घालणार का? असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -