घररायगडएमआयडीसीचे 49 कोटींचे पाणी बिल थकले

एमआयडीसीचे 49 कोटींचे पाणी बिल थकले

Subscribe

रायगड जिल्ह्यातील मोठ्या आणि श्रीमंत ग्रामपंचायतींमध्ये गणना होणार्‍या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे एमआयडीसीला देणे असलेले 49 कोटी 42 लाख 83 हजार 291 रुपये इतके पाणी बिल (दंडासह) थकले असून, यापुढे दरमहा ५ लाख ७४ हजार ११२ रुपये जमा न केल्यास पाणी कपात करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे.

ही थकबाकी ३१ मे अखेरपर्यंतची आहे. ग्रामपंचायत हद्दीत ५० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असून, वासांबे मोहोपाडासह नवीन पोसरी, आळी आंबिवली, खाने आंबिवली, शिवनगर, पानशिल, तळेगाव, तळेगाववाडी, गणेशनगर, रिस-२ (निवासी वसाहती), रिस-१, काळणवाडी, भटवाडी, रिसवाडी आदी गावांसह शिवनगरवाडी, शिंदीवाडी, मोहोपाडा वाडी, खोंडावाडी, पानशिलवाडी, तळेगाव आदीवासीवाडी यांचा समावेश या हद्दीत आहे. गेल्या 30 वर्षांपासून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून एमआयडीसीला पाणीकर तुटपुंज्या स्वरुपात भरला जात आहे.

- Advertisement -

याबाबत एमआयडीसीचे उप अभियंता एम. आर. के. राजू यांनी ग्रामपंचायतीच्या संबंधित समितीशी बोलून टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्यास सांगितले आहे आहे.

३१ मे २०२१ पर्यंत थकबाकी आकडेवारीः
वासांबे मोहोपाडा- ७ कोटी ६७ लाख ८७ हजार ८६९ रुपये
नवीन पोसरी- १३ कोटी १९ लाख ५९ हजार ६९५
खाने आंबिवली- ३ कोटी २६ लाख ५१ हजार ८२४
रिस (१)- ९ कोटी ४६ लाख ३६ हजार ७२८
रिस(२)- १५ कोटी ८३ लाख ४७ हजार १४५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -