घररायगडअलिबाग, पेणमध्ये पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

अलिबाग, पेणमध्ये पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

Subscribe

पाण्यासाठी महिलांना डोक्यांवर हंडे घेऊन वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी प्लॅस्टिकचे ड्रम घेऊन दीड ते दोन किलो मीटर अंतरापर्यंत पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणी टंचाईची तिव्रता आणखी वाढू लागल्याने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. दरवर्षी मे मध्ये सुरु होणारी पाणीटंचाई यंदा एप्रिलमध्येच सुरु झाली असून पेण, अलिबाग तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे. येथील २१ गावे आणि ११८ वाड्यांमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरु झाली आहे. या नागरिकांना १२ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातून टंचाईग्रस्त गावे व वाड्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नेहमी मे महिन्यात जाणवणार्‍या पाणी टंचाईने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मान्सून सुरु होईपर्यंत येथील लाखो नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चालू हंगामासाठी ११ कोटी ३९ लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात टंचाईग्रस्त गावे वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नळ पाणी योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरी खोदणे, विहिरींमधील गाळ काढणे तसेच इतर उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली,मिळखतखार या गावातील एकूण २ हजार ७७४ नागरिक पाणीटंचाईने प्रभावित झाले आहेत.

- Advertisement -

पाण्यासाठी महिलांना डोक्यांवर हंडे घेऊन वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी प्लॅस्टिकचे ड्रम घेऊन दीड ते दोन किलो मीटर अंतरापर्यंत पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणी टंचाईची तिव्रता आणखी वाढू लागल्याने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमधील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाकडून टँकरची सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे.

पाणी टंचाईवरील दृष्टीक्षेप
पाणीटंचाईग्रस्त गावे – २१
पाणीटंचाईग्रस्त वाड्या – ११८
प्रभावीत नागरिक – ५६६४
सुरु झालेले टँकर – १२

- Advertisement -

टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहेत. तरीही पाणी टंचाईच्या छळा कमी प्रमाणात लागाव्यात यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. ज्या गावांना तत्काळ पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
– संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, रायगड जिल्हा परिषद

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -