नाशकात बिबट्याचा बछडा जेरबंद!

पळसे शिवारातील गवंदे मळा परिसरातील संतोष रामदास गायधनी यांच्या मळ्यात लावलेल्या पिंज-यात २१ जुलै रोजी पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. सकाळी नागरिकांनी पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडलेला दिसल्यानंतर नागरिकांनी पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याचं लक्षात आलं.