घरश्रावण स्पेशलShravan Month 2020: जाणून घ्या 'श्रावणा'तील महत्त्वाच्या तारखा

Shravan Month 2020: जाणून घ्या ‘श्रावणा’तील महत्त्वाच्या तारखा

Subscribe

जाणून घ्या श्रावण महिन्यातील सणांच्या तारखा, वेळ आणि प्रारंभ तिथी.

श्रावण महिना हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिना म्हटलं की सण-समारंभ हे आलेच. मग श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन असे अनेक सण या महिन्यात येतात. मात्र, या सणांच्या तारखा, वेळ आणि प्रारंभ तिथी कोणती हे आपण पाहणार आहोत.

श्रावण महिना प्रारंभ तिथी, तारीख आणि वेळ

- Advertisement -

आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू झाला आहे. यंदा आषाढ अमावस्या २० जुलै दिवशी रात्री ११ वाजून ०२ मिनिटांनी संपली असून त्यानंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे.

यादिवशी केले जाणार मंगळागौर पूजन

श्रावण माहिन्यात यंदा २१, २८ जुलै, ४, ११, १८ ऑगस्ट दिवशी मंगळागौर पूजन केले जाणार आहे.

- Advertisement -

श्रावणी सोमवार

यंदा २७ जुलै, ३, १०, १७ ऑगस्ट दिवशी श्रावणी सोमवार साजरा केला जाईल. शंकर महादेवाच्या भक्तांसाठी श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व असते.

श्रावण महिन्याची समाप्ती

दरम्यान, १९ ऑगस्ट दिवशी रात्री ८ वाजून ११ मिनिटांनी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे.

श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीपासून सणांची धामधूम सुरू होते. यंदा नागपंचमी २५ जुलै रोजी आली असून नारळी पौर्णिमा म्हणजेच लाडक्या भाऊ-बहिणींचा सर्वाच आवडता सण रक्षाबंधन ३ ऑगस्टला आला आहे. तर श्रीकृष्ण जयंती ११ ऑगस्टला आली असून १२ ऑगस्टला गोपाळकाला म्हणजे दहीहंडी सण आहे. तर बैलपोळा हा सण १८ ऑगस्टला आला आहे. हे सण विशेष उत्साहाने साजरे केले जातात.

तसेच अनेक घरांमध्ये चांगला मुहूर्त पाहून सत्यानारायण पूजेचे देखील आयोजन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे महिनाभर मांसाहार, कांदा-लसूण युक्त जेवण, पदार्थ टाळले जातात.


हेही वाचा – Mangala Gauri Vrat 2020: श्रावणात असे करावे मंगळागौरी व्रत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -