घरक्रीडाIPL 2022: आयपीएल २०२२साठी लखनऊकडून ॲन्डी फ्लॉवर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती

IPL 2022: आयपीएल २०२२साठी लखनऊकडून ॲन्डी फ्लॉवर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती

Subscribe

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर यांना लखनऊ फ्रेंचाइजी टीमचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या दोन सत्रापासून ॲन्डी फ्लॉवर पंजाब किंग्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत होते. इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीझनमध्ये लखनऊ फ्रेंचाइजीमध्ये आता ते पदार्पण करत आहेत. अजून या टीमचे नाव निश्चित झाले नाही.

गेल्या दोन सत्रात पंजाब किंग्सचा कर्णधार राहिलेला केएल राहुल देखील संजीव गोएंका यांच्या लखनऊ फ्रेंचाइजमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. गोएंका यांच्या नेतृत्वाखाली आरपी-एसजी समूहाने लखनऊ फ्रेंचाइजीला ७०९० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. दरम्यान ॲन्डी फ्लॉवर प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यानंतर म्हणाले की, ‘मी नव्या लखनऊ फ्रेंचाइजीमध्ये सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि या संधीसाठी मी खूप आभारी आहे. मला १९९३ मधील भारतातील आपल्या पहिल्या दौऱ्यानंतर नेहमीच भारताचा दौरा करायला, येथे खेळायला आणि प्रशिक्षण करायचा आवडते.’

- Advertisement -

पुढे फ्लॉवर म्हणाले की, ‘भारतामध्ये क्रिकेटची आवड अतुलनीय आहे. एका आयपीएल फ्रेंचाइजीचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आहे. मी गोएंका आणि लखनऊ टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. तशीच मला खात्री आहे की, मी लखनऊ फ्रेंचाइजसोबत यशस्वी काम करण्याचे आव्हान पूर्ण करेन. मी नवीन वर्षात उत्तर प्रदेशला जाण्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांना भेटण्यास उत्सुक आहे.’


हेही वाचा – BWF World Championships 2021: वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पी. व्ही. सिंधू बाहेर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -