घरक्रीडाBWF World Championships 2021: वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पी. व्ही. सिंधू बाहेर

BWF World Championships 2021: वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पी. व्ही. सिंधू बाहेर

Subscribe

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २०२१मध्ये भारताला मोठा झटका बसला आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटन पट्टू पी.व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर आली आहे. पी. व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्याने ती स्पर्धेतून बाहेर आली आहे. यावेळी सिंधू आपले टायटल वाचवू शकली नाही. जगातील पहिल्या क्रमांकाची बॅडमिंटनपट्टू ताइ जू यिंगने सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. ४२ मिनिटे रंगलेल्या फेरीत सिंधूचा १७-२१, १३-२१ ने पराभव झाला.

- Advertisement -

 

चीनची खेळाडू ताइ जू यिंगने पी.व्ही,सिंधूला सलग पाचव्यांदा हरवले. आतापर्यंत दोघांमध्ये २० वेळा सामने रंगले ज्यातील १५ सामन्यात सिंधूला हार पत्करावी लागली. टोकीयो ऑलिम्पिक २०२०मध्ये देखील ताइ जू यिंगने सिंधूचा पराभव केला होता. या स्पर्धेत सिंधूने जिंकण्यासाठी कोणताही कसर सोडली नव्हती मात्र ताइच्या स्पीडसमोर सिंधू काहीही करू शकली नाही. सिंधूला सामन्या दरम्यान अनेकदा कार्ट कव्हर करणे,ड्रॉप शॉट सारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.

- Advertisement -

मागची जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप पी.व्ही. सिंधूने तिच्या नावे केला होता. सिंधूने वर्ल्ड सिंगल्सच्या क्षेणीत सहाव्या क्रमांकाचे मेडल मिळवले होते.


हेही वाचा – Hockey, India Vs Pakistan: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकला ३-१ ने हरवलं, हरमनप्रीतची उत्कृष्ट खेळी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -