Asian Games 2018: पुरूष हॉकी संघाला कांस्यपदक

भारतीय पुरूष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पाकिस्तानला २-१ ने मात देत कांस्यपदक आपल्या नावे केले आहे.

Asian Games 2018: Indian mens hockey team wins by 2-1 against pakistan and gets bronze medal
भारतीय हॉकी संघ

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरी केली असून सुवर्णपदक जरी भारताला मिळाल नसला तरी कांस्यपदक मात्र भारताने आपल्या नावे केले आहे. विशेष म्हणजे भारताने आपला पारपांरिक प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानला पराभूत केले आहे. उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभूत झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कांस्यपदकासाठी खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला २-१ ने पराभूत करत विजय आपल्या नावे केले आहे.

असा झाला सामना

उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानने पाकिस्तानला तर मलेशियाने भारताला पराभूत केल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात कांस्य पदकासाठी सामना खेळवला गेला सामन्यात सुरूवातीपासूनच दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी दाखवली चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताच्या आकाशदीपने सुरूवातीच्या तिसऱ्याच मिनीटाला गोल करत सामन्यात भारताला १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बराच काळ दोन्ही संघांला गोल करता आला नाही अखेर ५० व्या मिनीटाला हरमनप्रीत सिंहने गोल केला आणि भारताला २-० ची भक्कम आघाडी मिळवून दिली त्यानंतर ५२ व्या मिनीटाला पाकिस्तानच्या आतिकने गोल केला खरा मात्र २-१ च्या फरकाने अखेर भारत सामन्यात विजयी झाला.

क्रिडामंत्री राज्यवर्धन यांनीही केले अभिनंदन

भारतीय पुरूष हॉकी संघान पाकिस्तानवर मिळवलेल्या अप्रतिम विजयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना भारताचे क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून भारताच्या पुरूष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.