घरमहाराष्ट्रदेशातील सर्वात मोठ्या दहीहंडीला मुख्यमंत्री लावणार हजेरी

देशातील सर्वात मोठ्या दहीहंडीला मुख्यमंत्री लावणार हजेरी

Subscribe

देशातील सर्वात मोठी दहीदंडी ठाणे शहरात बांधण्यात येणार आहे. या दहीहंडीला राजकीय नेत्यांसह कलाकार देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहेत.

दहीहंडी सणाला अवघा एक दिवस राहिला आहे. त्यात राजकीय नेत्यांची दहीहंडी म्हटलं की लक्ष वेधणारी असते. अशीच एक देशातील सर्वात मोठी दहीदंडी ठाणे शहरात बांधण्यात येणार आहे. भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष आणि स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्या दहीहंडीने हे नवे आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. या दहीहंडीला १० थरांसाठी २५ लाख रुपयांचे भरघोस बक्षीस लावण्यात आले असून पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडीला हजेरी लावणार आहे.

केरळमधील पुरग्रस्तांना दिला जाणार निधी

ठाणे येथील  हिरानंदानी मिडोज चौक येथे स्वामी प्रतिष्ठानतर्फे सर्वात मोठी दहीहंडी बांधण्यात येणार आहे. या उत्सवाची तयारी पाहून ठाणेकरांमध्ये उत्सुकता देखील निर्माण झाली आहे. तसेच या दिवशी केरळमधील पुरग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांचा निधी देखील मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे.

- Advertisement -

गोविंदा पथकांना बक्षिसे

या दहीहंडीला मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे.  दहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला २५ लाख तर ९ थर लागल्यास ११ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच विविध थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना सुमारे ५० लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहे.

मनोरंजनासाठी कलाकारांची उपस्थिती

ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मिरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रिती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि इतर चार गायक आपली कला सादर करणार आहेत. जोडीला जव्हार येथील आदिवासीचा तारफा नृत्य आकर्षण ठरणार आहे.  ३ सष्टेंबरला सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दहीहंडी साजरी होणार आहे. तर २ सष्टेंबरला सेलिब्रेटींची दहीहंडी होणार आहे. सर्व ठाणेकर, गोविंदांनी या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दहीहंडी उत्सहात सामिल होऊन प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे आयोजक शिवाजी पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

राजकीय नेत्यांची उपस्थिती

ठाण्यातील या दहिहंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार कपिल पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, आमदार नरेंद्र पवार, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, गणपत गायकवाड, प्रशांत ठाकूर, किसन कथोरे, निरंजन डावखरे, महेश चौगुले, नरेंद्र मेहता, प्रवीण दरेकर, रमेश पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक, भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, प्रवक्ते फ्रेमजी शुक्ल, गटनेते मिलिंद पाटणकर, सरचिटणीस मुकेश मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -