घरक्रीडाऑस्ट्रेलियाने केला टीम इंडियाचा अपमान, वाचा नक्की काय झालं ?

ऑस्ट्रेलियाने केला टीम इंडियाचा अपमान, वाचा नक्की काय झालं ?

Subscribe

२०१४-१५ साली झालेल्या ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये कोहलीने चार शतकांची कामगिरी केली होती. विराट कोहलीला हरवण्यासाठी त्याचावर दबाव आणणे गरजेचे असल्याचे पूर्व ऑस्ट्रेलियाच्या टीमने सांगितले होते

ऑस्ट्रेलिया नेहमीच क्रिकेटच्या बाबतीत आक्रमक असते. विरुद्ध टीम विरोधात आक्रमक भूमिका घेत नेहमीच काहीतरी बरळत असते. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या संदर्भात ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्राने टीम इंडियाचा अपमान केला आहे. चक्क ‘डरपोक वटवाघूळ’ म्हणत त्यांनी टीम इंडियाचा अपमान केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघ एडिलेटला पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा अपमान केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सीरिजची मॅच होणार आहे. पहिली टेस्ट मॅच ६ डिसेंबरला होणार आहे.

वाचा- आमचे गोलंदाज कोहलीला अडचणीत टाकतील – टीम पेन

पत्रकाराने केली स्टोरी शेअर

ऑस्ट्रेलियन पत्रकार रिचर्ड हाइंडसने या संदर्भात एक बातमी तयार केली आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात त्याने भारताला हा सामना खेळण्यासाठी खूप अडचणी येतील असे म्हटले आहे. भारताला कशा अडचणी येतील याचे वृत्तांकन केले आहे. त्याने भारताने सामना खेळण्यासाठी अनेक कारणे देत ते घाबरतात हे दाखवून दिले आहे. असे त्याने म्हटले आहे. ही बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ती व्हायरल झाली. आणि अवघ्या काहीच वेळात भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला. हा निव्वळ पोरकटपणा आणि अशिष्टाचाराचे लक्षण असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

- Advertisement -

- Advertisement -

विराटने लगावले होते चार शतक

२०१४-१५ साली झालेल्या ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये कोहलीने चार शतकांची कामगिरी केली होती. विराट कोहलीला हरवण्यासाठी त्याचावर दबाव आणणे गरजेचे असल्याचे पूर्व ऑस्ट्रेलियाच्या टीमने सांगितले होते. त्यावरुनच या सगळ्या शब्दांच्या खेळाला सुरुवात झाली. पण या बातमीनंतर नेटीझन्सनी मात्र त्यांना चांगलेच ट्रोल केले.

 हे माहित आहे का? – कोर्टातही क्रिस गेलची जोरदार बॅटिंग; मानहानीचा खटला जिंकला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -