घरक्रीडाIndonesia Open 2021 : पी.व्ही सिंधूचा उपांत्यफेरीत प्रवेश; दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा केला...

Indonesia Open 2021 : पी.व्ही सिंधूचा उपांत्यफेरीत प्रवेश; दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा केला पराभव

Subscribe

भारताला ऑलिम्पिक मध्ये दोन वेळा पदक जिंकून देणारी पी.व्ही सिंधूचा दमदार फॉर्म कायम आहे तिने चांगल्या फॉर्मच्या जोरावर इंडोनेशिया ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे

भारताला ऑलिम्पिक मध्ये दोन वेळा पदक जिंकून देणारी पी.व्ही सिंधूचा दमदार फॉर्म कायम आहे. तिने चांगल्या फॉर्मच्या जोरावर इंडोनेशिया ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिने दक्षिण कोरियाची खेळाडू सिम यूजीनचा १४-२१, २१-१९, २१-१४ अशा फरकाने पराभव केला. तिसऱ्या स्थानावर असलेल्या मानांकित सिंधूची सुरूवात निराशाजनक झाली आणि बदल्यात तिला पहिल्या सेटमध्ये १४-२१ अशा तुरळक फरकाने पराभव पत्करावा लागला. मात्र पहिल्या सेटमधील पराभवानंतर सिंधुने शानदार पुनरागमन केले आणि एक तास सहा मिनिटे चाललेल्या सामन्यात शेवटच्या दोन्हीही सेटमध्ये आपले वर्चस्व राखून विजय मिळवला.

सिंधूचा पुढील सामना शनिवारी दुसऱ्या मानांकित थायलंडच्या रत्चानोक इंतानोन सोबत होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान अन्य लढतींमध्ये भारताचा बी साई प्रणीत आणि ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने असणार आहेत. जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानी असलेल्या प्रणीतने गुरूवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फ्रांन्सच्या क्रिस्टो पोपोवचा २१-१७, १४-२१, २१-१९ अशा फरकाने पराभव केला.

- Advertisement -

तत्पुर्वी, पीव्ही सिंधूने गुरुवारी झालेल्यामहिला एकेरीत जर्मनीच्या यव्होन लीचा सरळ सेटमध्ये पराभव करून इंडोनेशिया ओपन २०२१ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेतील तिसऱ्या मानांकित सिंधूने युऑनविरुद्ध चांगली कामगिरी करत अवघ्या ३७ मिनिटांत २१-१२, २१-१८ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सुरूवातीपासूनच्या अदलाबदलीनंतर दोन्ही खेळांडूनी चांगला खेळ केला. दरम्यान सिंधूने ६-४ अशा फरकाने आघाडी घेतली आणि गेमच्या शेवटपर्यंत आघाडी कायमर राखून सामन्यात विजय मिळवला. सोबतच तिने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.


हे ही वाचा: IPL 2022 Auction : दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतसह ४ खेळांडूना केले रिटेन; श्रेयस अय्यरचा पत्ता कट


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -