अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात

एपीआय अश्विनी बिंद्रे हत्येप्रकरणी व्होडाफोनचे नोडल ऑफिसर चांगदेव गोडसे यांची उलटतपासणी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी कण्यात आली.

एपीआय अश्विनी बिंद्रे हत्येप्रकरणी व्होडाफोनचे नोडल ऑफिसर चांगदेव गोडसे यांची उलटतपासणी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी कण्यात आली. त्यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजू पाटील हे कुरुंदकरच्या भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथील फ्लॅटवर असल्याचे मोबाईल जीपीआयएसवरून सिध्द झाले. त्यानंतर या प्रकरणातील आयडीया कंपनीच्या नोडल अधिकार्यांची गुरुवारी साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. आयडियाचे नोडल ऑफिसर विजय शिंदे यांना पॅरॅलिसिस अटॅक आलेला असतानासुद्धा साक्षीसाठी पुण्याहून न्यायमुर्ती माधुरी आनंद यांच्यासमोर हजर झाले. यावेळी शिंदे यांनी न्यायालयाने ओळख पटविण्यासाठी दाखविलेले कागद पत्रे ही आपण स्वत: हाताळली असून सीडीआरच्या २३ पत्रावरील सील शिक्का आणि सही मीच केला आहे, असे कोर्टासमोर सांगितले. त्यामुळे याप्रकरणाची पाळेमुळे बाहेर पडणार आहेत. शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होणार आहे.

आयडियाचे नोडल ऑफिसर विजय शिंदे यांना पॅरॅलिसिस अ‍ॅटक आलेला असताना साक्षीसाठी न्यायमुर्ती माधुरी आनंद याच्यासमोर हजर झाले. कंळबोली पोलीस आणि नवी मुंबई क्राईम ब्रॅचच्या टीमने पुण्यात जाऊन त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले. विजय शिंदे यांना पॅरॅलिसिस अ‍ॅटक आल्याने त्यांना डोळे सहज उघडत नसल्याने आणि त्याची मान उजवीकडे कायमस्वरूपी असल्यामुळेच वैद्यकीय पथक पुण्याहून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोबत तैनात ठेवण्यात आले होते. आयडियाचे नोडल ऑफिसर विजय शिंदे यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. डिसीपी झोन २ यांनी पाठविलेली सर्व म्हणजे तिन्ही पत्रे शिंदे यांना दाखविण्यात आली. शिंदे यांना ही कागदपत्रे आपणच हाताळलीत का?, असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ती स्वत: चाचपून ओळखली. मी डीसीपी झोन २ यांना सीडीआर पाठविल्याचे सांगत. त्या पत्रावरील सील शिक्का सही ही मीच केली आहे, असे कोर्टासमोर सांगितले.

या प्रकरणातील महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी फोन घेताना दिलेली कागदपत्रे ती देखील पाहिली आणि खरी आहे. महेश फळणीकर वापरत असलेल्या आयडिया मोबाईलचे सीडीआर असलेल्या २३ पानांवर सही शिक्का, सिल आणि कुंदन भंडारी यांच्या सीडीआरचे एक पान यावर सही शिक्का, सील मीच केले आहे. याबाबतची ६५ बीचे सर्व सर्टिफिकेट्स मीच तयार केले आणि सही देखील मीच केली आहे, असे नोडल ऑफिसर विजय शिंदे साक्षीत नमूद केले.
क्रॉसचीफमध्ये ६५ बी ची दिलेली सर्टिफिकेट्स खोटी आहेत. पोलिसांच्या सांगण्यावरून सीडीआर बनवून दिला, असा मुख्य आरोपी कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी क्रासचीफमध्ये युक्तिवाद केला गेला. गुरुवारी शिंदे यांची साक्ष नोंदविण्यात आल्यानंतर पुढील तपासणीसाठी याची सुनावणी शुक्रवारी होईल, असे न्यायाधीशांनी सांगितले. शिंदे यांना पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा पुण्याला सोडण्यात आले.

हेही वाचा –

खोटी कागदपत्रे देऊन प्रकल्प बाधितांच्या घरांमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहा जणांवर गुन्हे दाखल