घरक्रीडामोटेरात डे-नाईट कसोटी; इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर 

मोटेरात डे-नाईट कसोटी; इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर 

Subscribe

इंग्लंडचा संघ भारतात येणार असून या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारतात बराच काळ क्रिकेट बंद आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संघ भारतात येणार असून या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केले. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोटेरा (अहमदाबाद) येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये डे-नाईट कसोटी सामना होणार आहे. या सामन्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला कसोटी मालिकेपासून सुरुवात होणार असून पहिले दोन कसोटी सामने चेन्नईला, तर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या टी-२० मालिकेतील पाचही सामने मोटेरा येथेच होतील. तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पुणे येथे होईल.

- Advertisement -


  • इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक (२०२१) –

कसोटी मालिका :

- Advertisement -

पहिला सामना – ५ ते ९ फेब्रुवारी (चेन्नई), दुसरा सामना – १३ ते १७ फेब्रुवारी (चेन्नई), तिसरा सामना – २४ ते २८ फेब्रुवारी (अहमदाबाद) (डे-नाईट), चौथा सामना – ४ ते ८ मार्च (अहमदाबाद)

टी-२० मालिका :

पहिला सामना – १२ मार्च (अहमदाबाद), दुसरा सामना – १४ मार्च (अहमदाबाद), तिसरा सामना – १६ मार्च (अहमदाबाद), चौथा सामना – १८ मार्च (अहमदाबाद), पाचवा सामना – २० मार्च (अहमदाबाद)

एकदिवसीय मालिका :

पहिला सामना – २३ मार्च (पुणे), दुसरा सामना – २६ मार्च (पुणे), तिसरा सामना – २८ मार्च (पुणे)  


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -