घरताज्या घडामोडीविराटला वाचवा, नाहीतर परत द्या ,ब्रिटीश ट्रस्टचा मोदी सरकारला अल्टीमेटम

विराटला वाचवा, नाहीतर परत द्या ,ब्रिटीश ट्रस्टचा मोदी सरकारला अल्टीमेटम

Subscribe

बोरीस आणि मोदींना लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदी यांना मदत नाही केली तर गुजरातच्या अलंगमध्ये विराट जहाजाला भंगारात काढण्याची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते.

भारताच्या प्रजासक्ताक दिनाला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉ़नसन हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. बोरिस जॉ़नसन भारतात येण्याआधीच ब्रिटीश ट्रस्टने पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉनसन यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतीय नौदलातून सेवामुक्त झालेली आय एन एस विराट वाचवण्याची मागणी केली आहे. विराटला वाचवा, नाहीतर परत द्या असा अल्टीमेटम ब्रिटीश ट्रस्टने मोदी सरकारला दिला आहे.

रॉयल नेव्हीमध्ये विराटने महत्त्वाची सेवा दिली आहे. भारतीय नौदलाचे एअर क्राफ्ट विराटने भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बोरीस आणि मोदींना लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदी यांना मदत नाही केली तर गुजरातच्या अलंगमध्ये विराट जहाजाला भंगारात काढण्याची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते.

- Advertisement -

त्याचबरोबर हर्मीस हेरिटेज विराट हेरिटेज ट्रस्टने मोदी आणि बोरीस जॉनसन यांना लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, जर हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास भारताने २३ हजार ९०० टन युद्धनौका ब्रिटनला परत पाठवावे जिथे एक सागरी संग्रहालय स्थापित केले जाऊ शकते. त्याचबरोबर या पत्रात असे लिहिले आहे की, ट्रस्टने या प्रकरणात युद्धनौका मुंबईहून युकेला पाठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टोईंग एक्सपर्टकडून याबाबत कोटेशनही मिळाले आहे. त्यामुळे जर परवानगी मिळाली तर ट्रस्ट लिवरपूर सिटी सेंटरच्या बरोबर समोर विश्वस्तरीय सागरी संग्रहायल उभारण्यात येईल. ट्रस्ट सध्या आपल्या भारतीय पार्टनर एनवीटेक सोबत काम करित आहे. विराटला गोव्याच्या किनाऱ्यावरील सागरी संग्रहालयात रूपांतरीत करण्याचा प्रयत्न करित आहे.


हेही वाचा – लग्नात झाला कोरोनाचा शिरकाव, नवरदेवाचा मृत्यू आणि नववधू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -