घरक्रीडाबीसीसीआयची शनिवारी बैठक; टी-२० वर्ल्डकपचे आयोजन, आयपीएलबाबत होणार चर्चा

बीसीसीआयची शनिवारी बैठक; टी-२० वर्ल्डकपचे आयोजन, आयपीएलबाबत होणार चर्चा

Subscribe

आयपीएलचा उर्वरित मोसम १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी विशेष सर्वसाधारण बैठक (SGM) बोलावली असून यात टी-२० वर्ल्डकपचे आयोजन आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेबाबत चर्चा होणार आहे. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, आयपीएलचा उर्वरित मोसम १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या तीन आठवड्यांच्या कालावधीत घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा होणार आहे.

टी-२० वर्ल्डकपबाबत काय निर्णय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आगामी क्रिकेट मोसमाबाबत चर्चा करण्यासाठी ही सभा बोलावल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. मात्र, प्रामुख्याने टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात ऑक्टोबरमध्ये खेळवला जाणार आहे. परंतु, भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, ही स्पर्धा भारताबाहेर हलवण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) विचार करत आहे.

- Advertisement -

नुकसानभरपाई देण्याबाबतही चर्चा

आयसीसीची १ जून रोजी बैठक होणार असून त्याआधी बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. याच कारणाने बीसीसीआयच्या या सर्वसाधारण सभेला विशेष महत्व आहे. तसेच कोरोनामुळे रणजी करंडकाचा मागील मोसम रद्द करावा लागला होता. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना नुकसानभरपाई देण्याबाबतही या सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -