घरक्रीडाChampions trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानला जाणार?; icc चेअरमन ग्रेग बार्कले...

Champions trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानला जाणार?; icc चेअरमन ग्रेग बार्कले यांचे मोठे वक्तव्य

Subscribe

आयसीसीने काही दिवसांपूर्वीच शेजारील देश पाकिस्तानकडे चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे यजमानपद असणार असल्याची घोषणा केली होती

आयसीसीने काही दिवसांपूर्वीच शेजारील देश पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद असणार असल्याची घोषणा केली होती. यापूर्वी दोन दशकांच्या अगोदर पाकिस्तानमध्ये आयसीसीची स्पर्धा पार पडली होती. अशातच पाकिस्तान आयसीसीच्या या निर्णयाला आपला मोठा विजय मानत आहे, मात्र संभाव्य परिस्थिती पाहता भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार का याबाबत अद्याप संभ्रम आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट दरम्यान अनेकदा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी ला भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का यावर आयसीसीकडून भाष्य करण्यात आले आहे. आयसीसीचे नवे चेअरमन ग्रेग बार्कले यांनी सांगितले की, भारताने आताच्या घडीला पाकिस्तानचा दौरा करणे म्हणजे मोठे आव्हान असणार आहे.

भारताचा संघ २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार का यावर आयसीसी चेअरमन ग्रेग बार्कले यांनी म्हंटले की, “भारताला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे. मला माहित आहे हे सोपे काम नाही. आम्हाला याच्यावर काम करणे गरजेचे आहे. दोन्ही देशातील आंतरराष्ट्रीय संबंधनांना आम्ही हाताळू शकत नाही. मला वाटते की क्रिकेट एक माध्यम होऊ शकते त्यानुसार दोन्ही देशातील संबंध सुधारू शकतात. खेळ ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांना आणि देशाला एकत्रित आणू शकते. जर क्रिकेट दोन्ही देशातील परिस्थिती सुधारू शकते तर ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल”.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, भारत २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार की नाही यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. सुरक्षा व्यवस्था आणि अन्य काही घटकांवर विचार केल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

भारतात झालेल्या २०११ च्या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते पण त्यापूर्वीच पाकिस्तानात श्रीलंकेच्या संघावर झालेल्या आतंकी हमल्यामुळे पाकिस्तान मध्ये होणाऱ्या स्पर्धेला पूर्णविराम मिळाला होता. मागील २ वर्षांत कित्येक बड्या देशांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. हे पाहता पाकिस्तान हळू हळू आपले क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय संबंध चांगले करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी पाकिस्तामध्ये जाण्यास तूर्तास संयम बाळगला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: PAK vs BAN : पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रीक; ३-० च्या फरकाने बांगलादेशला केले चितपट


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -