घरक्रीडातिसऱ्या वनडेसाठी इंग्लंडच्या टीममध्ये बदल

तिसऱ्या वनडेसाठी इंग्लंडच्या टीममध्ये बदल

Subscribe

डेव्हिड मलानच्याऐवजी जेम्स विन्सचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सिरीज सध्या १-१ अशी बरोबरीत असून निर्णायक मॅच हेडिंग्लेला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंडनं भारताविरुद्ध मंगळवारी अर्थात १७ जुलैला खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे मॅचसाठी इंग्लंडच्या टीममध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. डेव्हिड मलानच्याऐवजी जेम्स विन्सचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सिरीज सध्या १-१ अशी बरोबरीत असून निर्णायक मॅच हेडिंग्लेला खेळवण्यात येणार आहे. डेव्हिड मलान आणि सॅम कुरेन या दोघांनाही टीममधून सध्या वेगळं करण्यात आलं असून भारत ए विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंड लायन्स टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मलानची नियुक्ती टेस्ट मॅचसाठी

ईएसपीएन वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, मलानला इंग्लंड लायन्स टीममध्ये घेण्यात आलं आहे. त्यासाठीच वनडे टीममधून त्याला मुक्त करण्यात आलं आहे. इंग्लंड लायन्सला इंडिया ए टीमविरुद्ध टेस्ट मॅच खेळायची असून मधल्या फळीत मलानला उतरवण्यात येईल. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध दोन टेस्ट मॅचमध्ये मलान खेळला असून तीन इनिंग्जमध्ये केवळ ४६ रन्स बनवू शकला होता.

- Advertisement -

मलानच्या जागी विन्स

घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केल्यामुळं इंग्लंड टीममध्ये विन्सची निवड करण्यात आली आहे. हॅम्पशरच्या २७ वर्षीय या खेळाडूनं नुकतंच समरसेटविरुद्ध १०९ रन्स तर यॉर्कशायरविरुद्ध १७१ रन्सची खेळी केली होती. वास्तविक अंतिम अकराच्या टीममध्ये विन्सला जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान तीन मॅचच्या सिरीजमध्ये दोन्ही संघानं एक – एक मॅच जिंकली असून मंगळवारी होणारी मॅच निर्णायक असेल. वनडे सिरीजनंतर १ ऑगस्टपासून ५ टेस्ट सिरीज भारत आणि इंग्लंड संघादरम्यान खेळवण्यात येणार असून ११ सप्टेंबरला सर्व मॅच संपतील.

इंग्लंडची टीम – इयान मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बॉल, लियाम प्लँकेट, बेन स्टॉक्स, आदिल राशीद, डेव्हिड व्हिली, मार्क वूड, जेम्स विन्स.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -