घरमनोरंजन...आणि अलीला शेवटपर्यंत आईस्क्रीम मिळालेच नाही

…आणि अलीला शेवटपर्यंत आईस्क्रीम मिळालेच नाही

Subscribe

अलीदेखील एका दुकानात गेला त्याने आईस्क्रीम मागवले पण विक्रेत्याने त्याला शेवटपर्यंत आईस्क्रीमसाठी झुलत ठेवले.

आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवणारा अली असगर सध्या इस्तांबुल दौऱ्यावर आहे. इस्तांबुल फिरण्यासोबतच तो तिकडे धम्मालसुद्धा करत आहे. त्याचा एक व्हिडिओ त्याने इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात इस्तांबुलमधल्या आईस्क्रिमवाल्याशी तो आईस्क्रीमसाठी झटताना दिसत आहे. आता इस्तांबुल म्हटल्यावर तुम्हाला ‘ते’ आईस्क्रीमवाले आठवले असतील आणि त्यांच्या गंमतीही आठवल्या असतील. अली असगरसारख्या विनोदवीरालाही या आईस्क्रीम विक्रेत्याने दमवून टाकले.

काय आहे व्हिडिओत?

इस्तांबुलमध्ये ठिकठिकाणी आईस्क्रीम विक्रेते आहेत. त्यांचे पोषाखही वेगळे असतात आणि  ते एका वेगळ्याच स्टाईलने आईस्र्किम देतात. म्हणजे अगदी दमेपर्यंत आईस्क्रीम देतच नाही. अलीदेखील एका दुकानात गेला त्याने आईस्क्रीम मागवले पण विक्रेत्याने त्याला शेवटपर्यंत आईस्क्रीमसाठी झुलत ठेवले. हा व्हिडिओ शेअर करत त्याने एक छान कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘हात तो आया पर मुह को ना लगा आईस्क्रीमवाला इन इस्तांबुल’

Haath aaya muh ko na laga ..?..ice cream wala in Istanbul ??

A post shared by Ali Asgar (@kingaliasgar) on

- Advertisement -

 अली व्हॅकेशनवर ?

कॉमेडी नाईटस विथ कपिलमध्ये वेगवेगळी पात्र रंगवणारा आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अली सध्या त्यांच्या इन्स्टाग्रामच्या फोटोवरुन तरी व्हॅकेशनमोडवर आहे असे वाटत आहे. या फोटोसोबतच त्याने इन्स्टावर इस्तांबुलच्या मार्केटमधील फोटो शेअर केला आहे. एकूणच अलीचे इन्स्टा अकाऊंट पाहिले तर त्याला फिरायला फार आवडते असेच वाटत आहे.

Chalat Musafirrrrr …spice bazaar Istanbul ??

A post shared by Ali Asgar (@kingaliasgar) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -