घरक्रीडाचेतेश्वर पुजाराला मोठा धक्का, 'या' काउंटी क्लबने केला करार रद्द

चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का, ‘या’ काउंटी क्लबने केला करार रद्द

Subscribe

पुजाराला काउंटी क्रिकेटमध्ये सहा चॅम्पियनशिप सामने खेळावे लागणार होते. ग्लॉस्टरशायरशी त्याचा १२ एप्रिल ते २२ मे दरम्यान करार होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट काउंटी स्पर्धेतील ग्लॉस्टरशायर संघाने कोरोना विषाणूमुळे भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्याशी केलेला करार रद्द केला आहे. पुजाराला काउंटी क्रिकेटमध्ये सहा चॅम्पियनशिप सामने खेळावे लागणार होते. ग्लॉस्टरशायरशी त्याचा १२ एप्रिल ते २२ मे दरम्यान करार होता. क्लबने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, २०२० च्या हंगामात आम्हाला चेतेश्वर पुजाराची शानदार फलंदाजी पाहता येणार नाही. तुम्हाला माहिती आहेच की मे २०२० पर्यंत कोणतीही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेले नाही. कोविड -१९ चा प्रभाव याक्षणी संपूर्ण देशभरात वाढत आहे.

काउंटी चॅम्पियनशिप विभाग एक कोरोना विषाणूमुळे रद्द करावी लागली. ही स्पर्धा १२ एप्रिलपासून खेळली जाणार होती. पुजारा यापूर्वी इंग्लंडमधील डर्बीशायर, यॉर्कशायर आणि नॉटिंगहॅमशायरकडून खेळला आहे. भारतीय कसोटी संघाचा मुख्य खेळाडू पुजारा आपल्या सशक्त तंत्रामुळे फलंदाजीला बळकट करण्यास सक्षम मानला जातो. ३२ वर्षीय पुजारा कराराबद्दल खूप उत्साही होता, परंतु कोरोनामुळे तो निराश झाला.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनासाठी महापालिकेच्या रुग्णालयात ११४ वॉर्डबॉयची भरती


आयपीएल जुलैमध्ये होणार

भारतातील मोठी आयपीएल स्पर्धा देखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या स्पर्धेवर अद्याप अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएल १५ एप्रिलनंतर होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु आहे. यावर बीसीसीआयने मास्टर प्लॅन तयार केला आहे.

- Advertisement -

आयपीएल होण्यासाठी बीसीसीआयने एक मास्टर प्लॅन तयार केला असून चाहत्यांना या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. कोरोनाचं सावट दुर झाल्यास आयपीएल जुलै महिन्यात किंवा हिवाळ्यात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय त्यावर विचार करत असून गरज पडल्यास चाहत्यांशिवाय सामना खेळवण्याची तयारी बीसीसीआय केली आहे.,” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एक वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -