घरक्रीडाCSK vs SRH : हैदराबादचा चेन्नईवर ८ विकेट्सने विजय, अभिषेक शर्माची शानदार...

CSK vs SRH : हैदराबादचा चेन्नईवर ८ विकेट्सने विजय, अभिषेक शर्माची शानदार खेळी

Subscribe

सनरायजर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने ५० चेंडूत सर्वाधिक ७५ धावांची खेळी खेळली. यासह आपले आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. हैदराबादने चेन्नईला ८ विकेट्सन मात दिली आहे. एसआरएचचा कर्णधार केन विलियमनसनने ३२ धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सवर सनरायजर्स हैदराबादने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा हा लागोपाठ चौथा पराभव आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नईने एकही सामना जिंकला नाही. शनिवारी झालेल्या डावात सनरायजर्स हैदराबादने रवींद्र जडेजाच्या संघाला एकतर्फी लढतीत पराभूत केलं आहे. हैदराबादने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाचा विजयाची चव चाखली आहे. चेन्नईकडून विजयासाठी १५५ धावांचे आव्हान देण्यात आले होते परंतु हैदराबादने २ विकेटच्या मोबदल्यात १७.४ ओव्हरमध्ये पूर्ण केलं आहे.

सनरायजर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने ५० चेंडूत सर्वाधिक ७५ धावांची खेळी खेळली. यासह आपले आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. हैदराबादने चेन्नईला ८ विकेट्सन मात दिली आहे. एसआरएचचा कर्णधार केन विलियमनसनने ३२ धावा केल्या आहेत. तर नाबाद खेळी करत राहुल त्रिपाठीने ३९ धावा केल्या आहेत. हैदराबादच्या संघातील गोलंदाजांनी मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५४ धावा केल्या. चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. रॉबिन उथप्पा १५ धावा करून बाद झाला, ऋतुराजने १६ धावा केल्या. चेन्नईकडून अष्टपैलू मोईन अलीने ४८ धावा केल्या. धोनी ३ धावा करून बाद झाला आणि जडेजाने २३ धावा केल्या. शिवम दुबे ३ धावा करून बाद झाला. हैदराबादकडून सुंदर आणि नटराजन यांनी २-२ विकेट घेतल्या.


हेही वाचा – आयपीएलमध्ये उद्या डबल धमाका; कोलकाताचा विजयी रथ रोखण्यास दिल्ली सज्ज

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -