घर क्रीडा बायोपिकद्वारे आता गांगुलीचीही 'दादागिरी'!

बायोपिकद्वारे आता गांगुलीचीही ‘दादागिरी’!

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन सौरभ गांगुलीची ‘दादागिरी’ चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे. त्याचे कारण म्हणजे गांगुलीवर लवकरच ‘बायोपिक’ येणार आहे. एकता कपूरची बालाजी फिल्म या बायोपिकची निर्मिती करणार आहे. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर, कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्यावर देखील यापूर्वी बायोपिक आले आहेत. त्यात आता भर पडली आहे ती भारतीय क्रिकेटचा ‘दादा’ सौरभ गांगुलीची!

कसा असेल बायोपिक?

- Advertisement -

‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकावरल हा बायोपिक असणार आहे. सौरभ गांगुलीने स्वत: हे पुस्तक लिहिले आहे. बायोपिकद्वारे आपल्याला भारतीय क्रिकेटचा दादा अर्थात सौरभ गांगुलीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. ‘बालाजी टेलिफिल्मशी माझी चर्चा झालेली नाही. ती झाल्यावर सर्वकाही कळेल’ अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. भारतीय संघाला ‘जिंकण्याची सवय लावणारा कर्णधार’ अशा लौकिकाने सौरभ गांगुली भारतीय क्रिकेटमध्ये ओळखला जातो. देशासह परदेशातही भारतीय क्रिकेट संघाने गांगुलीच्या नेतृत्वाखाली विजयश्री खेचून आणलीय. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला लागलेली विजयाची सवय आजही कायम आहे. एक गोष्ट मात्र नक्की गांगुलीच्या चाहत्यांना मात्र आपल्या लाडक्या दादाचा संघर्ष आता पडद्यावर पाहायाला मिळणार आहे.

कुणाकुणावर आलेत ‘बायोपिक’?

- Advertisement -

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी, क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन, अॅथलेटीक्स मिल्का सिंग, मेरी कोम आणि फोगाट भगिनींवर बायोपिक आलेत. या साऱ्या बायोपिकना प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘दादा’ची ही ‘दादागिरी’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार हे नक्की!

- Advertisment -