घरक्रीडाDavis Cup 2022 : भारताचे निर्भेळ यश; डेन्मार्कचे वाजले बारा

Davis Cup 2022 : भारताचे निर्भेळ यश; डेन्मार्कचे वाजले बारा

Subscribe

यजमान भारताने डेन्मार्कवर ४-० असा निर्भेळ विजय मिळवून डेव्हिस चषक स्पर्धेच्या जागतिक गट १ मधील आपले स्थान कायम राखले. तीन वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानचा ४-० असा फडशा पाडला होता. त्यानंतर प्रथमच भारताने निर्भेळ यश संपादण्याची किमया केली ती बुजुर्ग (वय ४२) रोहन बोपन्नाच्या अप्रतिम खेळामुळे. बोपन्नाने दिवीज शरणच्या साथीने भारताने सव्वा बाराच्या सुमारास डेन्मार्कच्या फ्रेडरिक निएल्सन आणि मिखाईल टो र्पोगार्ड या जोडीचे आव्हान ६-७ (४-७), ६-४, ७-६ (७-४), असे परतवून लावले आणि डेन्मार्क पुरते बारा वाजले.

दिल्ली जिमखाना शनिवारी जाम पॅक झाला होता. जागा मिळेल तिथे उभे राहून देखील दिल्लीकरांनी टेनिसचा आनंद मनमुरादपणे लुटला. गो इंडिया गो, जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा, अशा नारेबाजीने दिल्ली जिमखाना परिसर दुमदुमत होता. तळपत्या सूर्याच्या साक्षीने भारताने सफाईदार खेळ करत ग्रास कोर्टवरील खेळाचे सुरेख प्रात्यक्षीक दाखवून दिले. तमाम टेनिसरसिकांना खूष केले.

- Advertisement -

४२ वा बर्थडे शुक्रवारी साजरा करणाऱ्या रोहन बोपन्नाने आपला सारा अनुभव पणाला लावत मोक्याच्या क्षणी तीन मॅच पॉईंट तर वाचवलेच. पण नंतर बिनतोड सर्विस करुन आपल्या संघाची मदार समर्थपणे वाहिली. प्रतिस्पर्धी संघांचा कर्णधाराने पण त्याची तारीफ करण्याची दिलदार खिलाडूवृत्ती दाखवली. त्याला छान साथ लाभली ती छोट्या चणीच्या डावखुऱ्या दिवीज शरणची.

जवळपास दोन तास चाललेल्या या दुहेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत डेनिश खेळाडूंनी भारताला झुंजवले त्यांनी सहजासहजी हार पत्करली नाही. बोपन्नाच्या धारदार सर्विसने त्यांना धारेवर धरले. पण दिवीजची सर्विस जोरकस नव्हती. सामना लांबत गेला आणि डावखुऱ्या दिवीजला सूर गवसला. त्याने योग्य ठिकाणी फटके पेरून डेनिश खेळाडूंना सतावले. उभय संघांनी एकेक सेट जिंकल्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात भारतीय जोडीने १०-७ अशी बाजी मारली.

- Advertisement -

हेही वाचा : shane warne : शेन वॉर्नच्या निधनापूर्वीचे वास्तव आले समोर, थायलंडच्या घरात काय झाले? जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -