घरक्रीडाधोनी संघात असलाच पाहिजे !

धोनी संघात असलाच पाहिजे !

Subscribe

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी हा असा खेळाडू आहे जो संघात असलाच पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नने व्यक्त केले आहे. वॉर्न म्हणाला, जेव्हा गोष्टी अवघड होतात, तेव्हा प्रत्येक संघाला महेंद्रसिंग धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज पडते. माझ्यामते तरी धोनी हा एका महान खेळाडू आहे आणि तो संघात असलाच पाहिजे.

धोनीवर मागील काही काळात त्याच्या संथ फलंदाजीमुळे टीका झाली आहे. मात्र, टीकाकारांना आपण काय बोलतोय हे कळत नाही आहे हे वॉर्न म्हणाला. संघाला जिथे गरज आहे, तिकडे धोनी फलंदाजी करु शकतो. तो कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. जे लोक त्याच्यावर टीका करत आहेत, त्यांना आपण नेमके काय बोलतोय हेच समजत नाही आहे. त्याचा आतापर्यंतचा अनुभव पाहता भारतीय संघाला धोनीची विश्वचषकासाठी गरज लागणार हे निश्चित, असे वॉर्नने सांगितले.

- Advertisement -

तसेच विश्वचषक कोण जिंकणार असे विचारले असता वॉर्न म्हणाला, मागील ६ महिने ते एका वर्षात भारत आणि इंग्लंड ज्याप्रकारे खेळले आहेत, त्यावरून हे दोन संघ हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार आहेत असे मला वाटते. मात्र, ऑस्ट्रेलियालाही विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -