घरक्रीडाधोनीने निवृत्त होऊ नये -मलिंगा

धोनीने निवृत्त होऊ नये -मलिंगा

Subscribe

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी सध्या सुरु असलेल्या विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. धोनीला या विश्वचषकात आणि मागील एक-दीड वर्षात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच अखेरच्या षटकांमध्ये संथ फलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली आहे. मात्र, धोनी अजूनही अप्रतिम फलंदाज असल्याने त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, असे मत श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने व्यक्त केले आहे.

माझ्या मते धोनीने इतक्यात निवृत्त होऊ नये. तो अजून किमान एक-दोन वर्ष खेळावे. तो मागील १० वर्षांमधील सर्वोत्तम फिनिशर आहे आणि मला वाटत नाही की भविष्यात त्याच्यापेक्षा चांगला फिनिशर घडेल. तो खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा भारताच्या इतर खेळाडूंना फायदा होत असेल. धोनीने कर्णधार म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघ इतका यशस्वी झाला आहे, याचे श्रेय धोनीलाही दिले पाहिजे. मला वाटते की भारतीय संघ या विश्वचषकात कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो, असे मलिंगाने सांगितले.

- Advertisement -

तसेच श्रीलंकन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणार्‍या मलिंगाने भारताच्या जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. तो म्हणाला, बुमराह आणि शमी हे योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतात. बुमराहला अखेरच्या षटकांत गोलंदाजी करण्याचा बराच अनुभव आहे. तो दबाव असतानाही सर्वोत्तम खेळ करू शकतो. त्याने या स्पर्धेत खूप चांगले प्रदर्शन केले आहे, पण मी अजूनही त्याने ५ विकेट्स घेण्याची वाट पाहत आहे. त्याने उपांत्य फेरीत ५ विकेट्स घेतल्या, तर भारत नक्कीच जिंकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -