घरक्रीडाUS OPEN : थीम, झ्वेरेव अंतिम फेरीत  

US OPEN : थीम, झ्वेरेव अंतिम फेरीत  

Subscribe

थीमने उपांत्य फेरीत तिसऱ्या सीडेड मेदवेदेव्हचा पराभव केला.

दुसऱ्या सीडेड ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याने तिसऱ्या सीडेड रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचा ६-२, ७-६, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता रविवारी होणाऱ्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थीमसमोर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचे आव्हान असणार आहे. पाचव्या सीडेड झ्वेरेवने उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्तावर ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ अशी मात केली.

याआधी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही

थीम आणि झ्वेरेव यांनी याआधी कधीही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे हे दोघेही रविवारी होणारा अंतिम सामना जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. या दोघांनाही उपांत्य फेरीच्या सामन्यात झुंजार खेळ करत आपापले सामने जिंकले. थीम आणि मेदवेदेव्ह यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा होईल हे अपेक्षितच होते. या सामन्याचा पहिला सेट थीमने ६-२ असा सहजपणे जिंकला. दुसरा आणि तिसरा सेट जिंकण्यासाठी मात्र त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले, जे थीमने जिंकले. ‘आम्ही दोघांनीही या सामन्यात चांगला खेळ केला. हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केल्याचा मला आनंद आहे,’ असे सामन्यानंतर थीम म्हणाला.

- Advertisement -

सलग तीन सेट जिंकत सामनाही जिंकला 

दुसरीकडे कारेनो बुस्ताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात झ्वेरेवने पहिले दोन सेट ३-६ आणि २-६ असे गमावले होते. परंतु, यानंतर त्याने उत्कृष्ट खेळ करत सलग तीन सेट जिंकत हा सामनाही जिंकला. ‘मी पहिले दोन सेट गमावले यावर माझा विश्वास बसत नव्हता. या सामन्यात माझे पारडे जड मानले जात होते. त्यामुळे दोन सेटनंतर मी माझ्या खेळात सुधारणा करणे गरजेचे झाले होते,’ असे सामन्यानंतर झ्वेरेवने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -