घरIPL 2020IPL 2020 : CSKला मोठा धक्का! ब्राव्हो स्पर्धेतून आऊट 

IPL 2020 : CSKला मोठा धक्का! ब्राव्हो स्पर्धेतून आऊट 

Subscribe

ब्राव्हो हा चेन्नई संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. 

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने यंदाच्या आयपीएल मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांना १० पैकी केवळ तीन सामने जिंकता आले असून त्यांनी सात सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. त्यातच आता चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. ब्राव्हो हा चेन्नई संघाचा महत्त्वाचा सदस्य असून गेल्या शनिवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो अखेरचे षटक टाकू शकला नव्हता आणि याचा फटका चेन्नईला बसला होता. चेन्नईने तो सामना गमावला होता.

अनुभवी खेळाडूंची उणीव

‘ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही,’ असे चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले. ब्राव्होला यंदाच्या मोसमात विशेष कामगिरी करता आली नव्हती. सहा सामन्यांत त्याला केवळ सात धावा करता आल्या होत्या, तर गोलंदाजीत त्याने सहा विकेट घेतल्या होत्या. मात्र, त्याच्या गाठीशी बराच अनुभव असल्याने तो उर्वरित सामन्यांत न खेळणे हा चेन्नईसाठी मोठा धक्का आहे. चेन्नईला अनुभवी खेळाडूंची उणीव भासत आहे. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या चेन्नईच्या प्रमुख अनुभवी खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -