घरताज्या घडामोडीमोदी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना खास दिवाळी गिफ्ट

मोदी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना खास दिवाळी गिफ्ट

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राने एक मोठी घोषणा केली आहे. ३० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देणार असल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मोदी कॅबिनेट बैठकमध्ये या निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरद्वारे सरळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. तसेच ताबडतोब पैसे पाठवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.’

- Advertisement -

यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल फेस्टिव्हल Advance स्कीमची घोषणा केली होती. या स्कीमद्वारे कर्मचारी Advanceमधून कर्मचारी १० हजार घेऊ शकतात. केंद्रीय कॅबिनेटने वित्त वर्ष २०१९-२० साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (पीएलबी) आणि नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजूरी दिली आहे. या घोषणेचा ३० लाख नॉन-गजेटेड कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, ‘विजयादशमी किंवा दुर्गा पूजापूर्वी केंद्र सरकार ३० लाख कर्मचाऱ्यांना ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.’

- Advertisement -

कॅबिनेटच्या बैठकीत अजून कोणता निर्णय झाला?

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत जम्मू-काश्मीरमधील जिल्हा पंचायत निवडणुका करण्यास देखील मंजूरी दिली गेली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ‘कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सर्व कायदे लागू झाले आहेत. गेल्या आठवड्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीचा कायदा झाला. आज केंद्रीय कॅबिनेटने जिल्हा परिषदच्या निवडणुका करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.’

प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पंचायत स्तरावर निवडणुका होतील. आता जम्मू-काश्मीरमध्ये त्रिस्तरीय पंचायत असेल. यासाठी त्यांना आर्थिक सत्ताही मिळेल. आता निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि लोक मताधिकारद्वारे आपले जनप्रतिनिधी निवडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जे वचन केले होते, ते पूर्ण झाले.’


हेही वाचा – Work From Home चा दबाव सहन न झाल्याने इंजिनिअर तरूणाची आत्महत्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -