दिवाळीत स्वस्त घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी; SBI देतेय मोठी ऑफर

home loan

सणासुदीच्या काळात घर घ्यायचं असेल तर SBI ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. स्टेट बँक इंडियाने सणांच्या पार्श्वभूमीवर ऑफर घोषित केली आहे. घर खरेदीसाठी बँक ग्राहकांना २५ बेसीस पॉईंटपर्यंत सूट देणार आहे. YONO App वरुन गृह कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. SBI च्या गृहकर्जावर ६.९० टक्के व्याज दर आहे. हे व्याज दर ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर हे व्याज लागू होते.

  • SBI ने सणांच्या काळात व्याजाच्या दरांवर २५ बेसीस पॉईंट पर्यंत सूट दिली आहे.
  • ७५ लाखांपेक्षा अधिकच्या गृह क्रजावर २० बेसीस पॉईंट पर्यंत सूट दिली आहे. मात्र हे तुमच्या सीबील (CIBIL) स्कोरवर आधारित असेल. यामुळे ज्यांचा CIBIL स्कोर जास्त असेल त्याना फायदा आहे.
  • योनो App द्वारे गृहकर्जासाठी अर्ज केला असेल आमि मंजूर झालं असेल तर ५ बेसीस पॉईंटची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

अनलॉकमध्ये गृहकर्जाच्या मागणीत वाढ

एसबीआयचे रिटेल आणि डिजिटल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक सीएस सेट्टी म्हणाले की अनलॉकमध्ये गृहकर्जांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता आम्ही ग्राहकांना चांगल्या अतिरिक्त सवलती देत आहोत. गृहकर्जांवरील एसबीआयचे व्याज दर तरीही कमी आहेत. आता दहा नवीन घोषणांनंतर लोकांना त्यांचे स्वप्नवत घर तयार करण्यास किंवा खरेदी करण्यास मदत होईल.


हेही वाचा – ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’; मुनगंटीवारांची खडसेंना साद