घरक्रीडाइंग्लंडच अ‍ॅशेस जिंकणार! - मायकल वॉन

इंग्लंडच अ‍ॅशेस जिंकणार! – मायकल वॉन

Subscribe

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होणार्‍या विश्वचषकाकडे सध्या सार्‍या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. मात्र, त्यानंतर लगेचच इंग्लंडमध्येच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये अ‍ॅशेसला सुरुवात होणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांसाठी पुढील काही महिने क्रिकेटची पर्वणी असणार आहे. अ‍ॅशेस मालिका म्हटली की चाहते तसेच खेळाडू यांच्यात शाब्दिक चकमकी-वादविवाद या गोष्टी ठरलेल्याच असतात. या मालिकेला अजून ३ महिने बाकी आहेत, मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आतापासूनच ऑस्ट्रेलियावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वीच या अ‍ॅशेस मालिकेत नवे ड्युक्स चेंडू न वापरता पुन्हा मागील २ वर्षांतील ड्युक्स चेंडू वापरण्याचा निर्णय घेतला होता. या गोष्टीचा फायदा घेत इंग्लंडच अ‍ॅशेस जिंकणार, असे वॉनचे म्हणणे आहे.

इंग्लंडच यंदा अ‍ॅशेस जिंकणार असे माझे स्पष्ट आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू किती फिट आहेत, हेसुद्धा पाहावे लागेल. इंग्लंडच्या वातावरणात चेंडूवर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. यावर्षी बनवण्यात आलेल्या ड्युक्स चेंडूची सिम चांगली नाही. त्यामुळे कौंटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना बर्‍याच अडचणी येत आहेत. चेंडू जराही स्विंग होत नाही. चेंडू स्विंग होत नसेल, तर वेगवान गोलंदाजाचा वेग आणि फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बाजवतात. जर तसे झाले असते, तर ऑस्ट्रेलियन संघाला त्याचा फायदा झाला असता. त्यामुळे पुन्हा मागील २ वर्षांतील ड्युक्स चेंडू वापरण्याचा इंग्लंडने घेतलेला निर्णय योग्यच आहे. इंग्लंडचे गोलंदाज चेंडू चांगला स्विंग करत असल्याने त्यांना या चेंडूंचा फायदा होईल, असे वॉन म्हणाला.

- Advertisement -

इंग्लंड अ‍ॅशेस मालिका जिंकेल असे वॉनला वाटत असले तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपासून सावध रहा, अशी ताकीद त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना दिली आहे. याबाबत त्याने सांगितले, ऑस्ट्रेलियाकडे खूप चांगले गोलंदाज आहेत. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, जाय रिचर्डसन, जेम्स पॅटिन्सन हे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतील. त्यामुळे या दोन्ही संघांचे फलंदाज कसे खेळतात, यावर ही मालिका कोण जिंकणार हे ठरेल.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -