घरक्रीडाFIFA 2018 : ट्युनिशियाला नमवून बेल्जियम बाद फेरीत

FIFA 2018 : ट्युनिशियाला नमवून बेल्जियम बाद फेरीत

Subscribe

बेल्जियमने ट्युनिशियाचा ५-२च्या फरकाने हरवत धमाकेदार विजय मिळवला आहे

फिफा विश्वचषकाच्या जी गटातील ट्युनिशियाविरूद्ध बेल्जियम या सामन्यात बेल्जीयमने अप्रतिम खेळ दाखवत बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात पनामाविरूद्ध २ गोल करणाऱ्या लुकाकूने आजच्या सामन्यातही धमाकेदार खेळी दाखवत २ गोल केले आहेत. ज्यामुळे तो यावर्षीच्या विश्वचषकातील आतापर्यंतचा टॉप गोलस्कोरर पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो याची बरोबरी केली आहे.

lukaku
बेल्जियमचा स्टार खेळाडू लुकाकू

सामना सुरूवातीपासूनच बेल्जियमच्या बाजूने दिसून येत होता. सहाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उचलत हजार्डने पहिला गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मग लुकाकूची जादू पाहायला मिळाली. १६व्या मिनिटाला लुकाकूने दुसरा गोल करत बेल्जियमला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र लगेचच ट्युनिशियाकडून ब्रॉनने १८व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात आपण बरोबरीत जाऊ असा आशेचा किरण ट्युनिशियाच्या खेळाडूंना दिसता होता. मात्र लगेचच बेल्जियमच्या लुकाकूने हाफ टाईमच्या अतिरीक्त वेळेत गोल करत बेल्जियमला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

हाफ टाईमनंतर ५१व्या मिनिटाला हजार्डने चौथा गोल करत आपल्या संघांला जबरदस्त आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बराच वेळ दोन्ही संघाना गोल करता आला नाही. ९०व्या मिनिटाला बेल्जियमच्या बेतशुआइने गोल केला. तर त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेत ट्युनिशियाच्या खाझरीने गोल केला. त्यामुळे सामन्याचा अखेर ५-२ गोलने ट्युनिशियाचा दणदणीत पराभव झाला.

hazard

- Advertisement -

बेल्जियम खेळाडू हजार्डया सामन्यातील विजयामुळे बेल्जियमचा संघ जी गटाच्या गुणतालिकेत प्रथम स्थानी पोहोचला आहे. ६ गुणांसह त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर ट्युनिशियाचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -