घरटेक-वेकनेटवर्क नाही? मग करा 'WIFI' कॉल

नेटवर्क नाही? मग करा ‘WIFI’ कॉल

Subscribe

मोबाईल नेटवर्क नाही म्हणून तुम्हीसुद्धा बऱ्याचदा हैराण झाले असाल ना? मात्र आता थेट 'वायफाय'चं नेटवर्क वापरुन तुम्ही कुठेही आणि कधीही कॉल लावू शकणार आहात.

मोबाईल तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली असली तरी मोबाईल नेटवर्कची समस्या अद्यापही पूर्णत: सुटू शकली नाहीये. बऱ्याच जागांवर गेल्यावर आपल्या मोबाईलचं नेटवर्क पूर्णपणे गायब होऊन जातं. त्यातही अशावेळी आपल्याला एखादा महत्वाचा कॉल करायचा असल्यास आपण खूपच अस्वस्थ होतो. आता महत्वाचा कॉल करायचा कसा? हा प्रश्न आपल्याला अडचणीत टाकतो. मात्र, आता लवकरच वायफाय नेटवर्क आपली ही समस्या दूर करणार आहे. भारतातील बहुतांशी मोबाईल युजर्सना सातत्याने खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा फटका बसत असतो. त्यामुळेच ‘ट्राय’ने (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ही शिफारस केली आहे.

‘वायफाय’ करणार कॉलिंगची समस्या दूर

नुकत्याच ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आता वायफाय नेटवर्कचा वापर करुन आपण व्हॉईस कॉल करु शकणार आहोत. यासंबंधी दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतचे जे परवाने आहेत त्यामध्ये काही आवश्यक बदल केले आहेत. या बदलांमुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोन्हीसाठी एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.

- Advertisement -

‘असा’ लागणार वायफाय कॉल

वायफाय कॉल लावण्यासाठी युजर्सना सर्वप्रथम त्यांच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करावं लागेल. प्रत्येक युजरला त्या त्या टेलिकॉम कंपनीकडून हे अॅप उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे युजर ज्या कंपनीचं सिमकार्ड वापरत असेल त्याच कंपनीचा टेलिफोनी त्याला मिळेल. सिमकार्डसोबत तुमचा जो नंबर लिंक आहे तोच नंबर तुम्ही या अॅपमध्ये रजिस्टर करायचा आहे. रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यानंतरच तुम्ही या सुविधेचा वापर करु शकता.
.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -