घरमनोरंजनझकास.. 'अनिल कपूर'ची बॉलिवूडमध्ये ३५ वर्षे पूर्ण

झकास.. ‘अनिल कपूर’ची बॉलिवूडमध्ये ३५ वर्षे पूर्ण

Subscribe

ट्विटरवरुन सांगितला ३५ वर्षांचा प्रवास...

बॉलिवूडमधील झक्कास अभिनेता ‘अनिल कपूर’ यांनी बॉलिवूडमध्ये आपली ३५ वर्षे आज पूर्ण केली आहेत. यावेळी सोशल मीडियावरुन त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रावासाचे फोटो शेअर केले आहेत. अनिल कपूर यांनी फिल्मी प्रवास साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून केली होती. तीन दक्षकानंतर आजपण अनिल कपूर चित्रपटांमध्ये तेवढ्याच उत्साहाने काम करतांना दिसतात. आपल्या तीन दक्षकाहून अधिक वर्षांच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक भूमिका केल्या. आजच्या दिवशी अनिल कपूर यांचा पहिला चित्रपट ‘वो सात दिन’ (२३ जून १९८३) प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, नसिरूद्दीन शाह आणि नीरु फुले यांच्यासह अनेक कलाकारांनी अभिनय केला. हा चित्रपट त्यावेळी खूप चालला असून यानंतर अनिल कपूर यांनी पुन्हा कधी मागे वळून बघितले नाही.

 

- Advertisement -

कपूर यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पहिल्यांदा चित्रपटात काम केले. त्यावेळी त्यांनी शशी कपूर यांच्या बालपणाची भूमिका केली होती. या चित्रपटाला योग्य यश मिळू शकले नाही मात्र तरीही ते निराश झाले नाही. तेलगू चित्रपट ‘वम्सा वृक्षम्’ मधून सुरुवात केल्यानंतर त्यांनी मणीरत्नम यांच्या ‘पल्लवी अनि पल्लवी’ या चित्रपटातही काम केले. ९० च्या दक्षकात त्यांच्या मशाल, युद्ध, मेरी जंग, कर्म, चमेली की शादी, मिस्टर इंडिया, राम लखन आणि लाडला हे चित्रपट गाजले आणि अनिल कपूर हे सुपरस्टार बनले.

- Advertisement -

अनिल कपूर यांचे गाजलेले चित्रपट

अनिल कपूर म्हणाले की,”चित्रपटांबद्दल आवड असल्याने मी चांगले काम करु शकलो. पैसे कमवणे किंवा नंबर वन रहाण्याच्या मोहात मी कधीच पडलो नाही. लोकांना हसवण्यासाठी किंवा रडवण्यासाठी नेहेमी वेगळ्या भूमिका केल्या.  माझे व्यक्तीमत्व नेहेमीच आशावादी राहिले आहे. ज्यावेळी मी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी मी माझ्या पात्रांवर अधिक महेनत करायचो. यासाठी मी विशेश कोच नेमण्यात येत असून त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. या प्रवासादरम्यान माझ्या अभिनयातील काही गोष्टी आजही लोकांना आवडतात. मग ती ‘झकास’ बोलण्याची स्टाईल असो किंवा राम लखन चित्रपटातील ‘एजी ओजी’ गाण्यातील डान्स असो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -