घरक्रीडाFirst ever one day international: आज 51 वर्षांचा झाला वनडे; पावसामुळे मर्यादित...

First ever one day international: आज 51 वर्षांचा झाला वनडे; पावसामुळे मर्यादित षटकांच्या प्रकाराचा पायंडा

Subscribe

विशेष म्हणजे या प्रकारातील पहिला सामना हा ऑस्ट्रेलियानं जिंकला होता आणि तर 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एडरिचने वनडे इतिहासात पहिला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब मिळवला होता. नाणेफेक हारून पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडच्या संघानं 39.4 षटकांत (8 चेंडूंचा एक षटक)190 धावांवर गाशा गुंडाळला.

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात 5 जानेवारीला विशेष स्थान आहे. पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना (ODI) आजही (5 जानेवारी 1971) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न क्रिकेट मैदाना(MCG)वर खेळला गेला होता. सध्या एकदिवसीय सामना 50-50 षटकांचा आहे. पण तो पहिल्यांदा 40-40 षटकांच्या प्रकारात होता. कालांतरानं त्यात बदल करण्यात आला.

विशेष म्हणजे या प्रकारातील पहिला सामना हा ऑस्ट्रेलियानं जिंकला होता आणि तर 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एडरिचने वनडे इतिहासात पहिला ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब मिळवला होता. नाणेफेक हारून पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडच्या संघानं 39.4 षटकांत (8 चेंडूंचा एक षटक)190 धावांवर गाशा गुंडाळला. त्याचदरम्यान ऑस्ट्रेलियानं 42 चेंडू राखत 5 विकेट गमावून विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं विजयाची मालिकाच सुरू केली.

- Advertisement -

खरं तर 7 सामन्यांच्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ नोव्हेंबर 1970 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ब्रिस्बेन आणि पर्थमध्ये मालिकेचा पहिला आणि दुसरा सामना खेळला गेला. दोन्ही सामने बरोबरीत सुटले. तिसरा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (31 डिसेंबर 1970 ते 5 जानेवारी 1971) मध्ये होणार होता, परंतु पावसामुळे सामना सुरूच झाला नाही.

तेव्हा 6 दिवसांचा सामना असायचा, ज्यात एक दिवस रेस्ट डे होता. अशा परिस्थितीत सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाऊस थांबला ,तेव्हा दोन्ही संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज झाले आणि त्यामुळे क्रिकेटचा एक नवा प्रकार उदयास आला. विशेष म्हणजे मेलबर्नमधील स्थानिक लोकांचे मनोरंजन आणि खेळाडूंचा आर्थिक नफा लक्षात घेऊन दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा सामना पाहण्यासाठी MCG येथे 46000 प्रेक्षक जमले होते. एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास 51 वर्षांत (27 नोव्हेंबर 2021) 50 षटकांच्या या प्रकारामध्ये 4338 सामने खेळले गेले आहेत.

- Advertisement -

एकदिवसीय विजयी सामने

पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड मेलबर्न, ऑस्ट्रेलिया जिंकली – 5 जानेवारी 1971
1000वा सामना: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉटिंगहॅम, वेस्ट इंडिज जिंकले – 24 मे 1995
2000 वा सामना: पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, शारजाह, पाकिस्तान जिंकला, 10 एप्रिल 2003
3000 वा सामना: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, साउथम्प्टन, इंग्लंड जिंकला, जून 22-2010
4000 वा सामना: हाँगकाँग विरुद्ध पापुआ न्यू गिनी, PNG विजयी, हरारे मार्च 17-2018

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -